अपडेटेड फीचर्ससह नवी बजाज पल्सर लाँचिंगसाठी सज्ज

बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनी लवकरच आपल्या बाईकच्या पल्सर (Bajaj Pulsar) रेंजमध्ये नवीन रंगाचा पर्याय देऊ शकते.

अपडेटेड फीचर्ससह नवी बजाज पल्सर लाँचिंगसाठी सज्ज
Bajaj Pulsar 220F
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 6:00 AM

मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) लवकरच आपल्या बाईकच्या पल्सर रेंजमध्ये नवीन रंगाचा पर्याय देऊ शकते. पल्सर 220 एफ (Pulsar 220F) नवीन रंगासह ऑनलाइन पाहायला मिळाली आहे. 220F कंपनी रेड/व्हाईक कलर स्कीमसह सादर करु शकते. नवीन पल्सर 220 एफ दोन नवीन पेंट स्कीममध्ये लाँच केली जाईल. यापैकी पहिली कलर स्कीम ब्लॅक मॅटसह रेड ग्राफ्रिक्ससह असेल, तर रेड आणि ब्लॅक शेडसह दुसरी कलर स्कीम सादर केली जाऊ शकते. (New Bajaj Pulsar 220F will launch in India with new updated features)

दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे की, या बाईकमध्ये नवीन बोल्ड ग्राफिक्सदेखील दिले जाऊ शकतात. बजाजने आपली पल्सर 150 आणि पल्सर 180 श्रेणीसुद्धा अपडेट केली आहे. कंपनीने आतापर्यंत 220 एफ ही बाईक सर्वात कमी वेळा अपडेट केली आहे. या मोटारसायकलला संपूर्ण भारतात मोठी मागणी आहे. या मोटारसायकलची किंमत 1.25 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बजाज पल्सर 220 एफ मध्ये 220 सीसीचे सिंगल सिलिंडर ऑइल कूल्ड इंजिन आहे जे 8500 आरपीएम वर 20.11 बीएचपी पॉवर आणि 7000 आरपीएम वर 18.55 एनएमची पीक टॉर्क देते. गीअरबॉक्स 5 स्पीड युनिटसह सादर करण्यात आहे. यामध्ये 17-इंचाचा एलॉय आहे जो समोरच्या भागात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस डुअल शॉक अब्जॉर्बरसह मिळेल.

ब्रेकिंगसाठी वाहनात डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. जर आपण या बाईकच्या काही महत्त्वाच्या फीचर्सविषयी चर्चा केली तर तुम्हाला यात एलईडी टेल लँप्स, सेमी डिजिटल कन्सोल, हॅलोजन टाइप प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि 15 लीटर इंधन टाकी देण्यात आली आहे. या बाईकची किंमत सध्या 1.25 लाख रुपये इतकी आहे.

280 mm डिस्क ब्रेक

मोटारसायकलला पूर्वीप्रमाणे टेलिस्कोपिक फोर्क अपफ्रंट आणि मागील बाजूस 5-वे अॅडजस्टेबल नायट्रॉक्स शॉक अब्जॉर्बर मिळेल. यात समोरच्या बाजूस 280 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 230 मिमी डिस्क ब्रेक आहे. दुचाकीला ट्यूबलेस टायर्ससह 17-इंचाचे अलॉय शॉड मिळू शकतात आणि इंधन टाकीची क्षमता 15 लीटर इतकी आहे.

दोन नवी कलर स्कीम

कंपनीने अद्याप या या बाईकच्या दोन नवी कलर स्कीमबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पल्सर 220 एफ सर्वात जुनी बाईक आहे. यात कंपनीने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट अपग्रेडसह बाईक बाजारात दाखल केली आहे. ज्या बजाज बाईक्समध्ये आजही जुन्या हार्डवेअरचा वापर केला जातो, त्या बाईक्सच्या यादीत 220 एफचादेखील समावेश आहे. आतापर्यंत या बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(New Bajaj Pulsar 220F will launch in India with new updated features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.