1200 किमी रेंज देणारी कार, फीचर्स आणि लुक असा की खरेदीसाठी प्रचंड गर्दी, किंमत किती?
एकदा फुल टँक केली तर ही कार देते 1200 किमी रेंज. फीचर्स आणि लूक पाहून ग्राहकांची कार घेण्यासाठी होतेय प्रचंड गर्दी. किंमत किती?

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या हायब्रिड आणि स्ट्रॉन्ग हायब्रिड कारची लोकप्रियता वाढत आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचाही वापर केला जातो. त्यामुळे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरच्या एकत्रित क्षमतेमुळे या कार सामान्य पेट्रोल कारच्या तुलनेत अधिक मायलेज देतात. विशेष म्हणजे, काही हायब्रिड कार एकदा फुल टँक केल्यानंतर तब्बल 1,200 ते 1,300 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात. मारुती सुझुकी, टोयोटा आणि होंडा या कंपन्यांच्या कारचा या यादीत समावेश आहे. यामध्ये होंडा ZR-V e ही सर्वाधिक रेंज देणारी कार ठरते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार फुल टँकमध्ये सुमारे 1,300 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
होंडा ZR-V e
या यादीत होंडा ZR-V e पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 22.8 किमी मायलेज देते. यामध्ये 57 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. त्यामुळे फुल टँकवर ही कार सुमारे 1,300 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ही कार फुल्ली लोडेड Sport e व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनी ही कार जपानमधून CBU मार्गाने भारतात आणते. या कारची एक्स-शोरूम किंमत 47.99 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस स्ट्रॉन्ग हायब्रिड
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस स्ट्रॉन्ग हायब्रिड हीदेखील दमदार मायलेज देणाऱ्या कारपैकी एक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 28.65 किमी मायलेज देते. यामध्ये 45 लिटर क्षमतेची फ्यूल टँक मिळते. त्यामुळे एकदा टँक फुल केल्यानंतर ही कार सुमारे 1,289 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
टोयोटा कॅमरी हायब्रिड
टोयोटा कॅमरी हायब्रिड या यादीतील आणखी एक प्रीमियम कार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 25.49 किमी मायलेज देते. यामध्ये 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. त्यामुळे फुल टँकवर या कारची अंदाजे रेंज 1,275 किलोमीटर आहे.
मारुती सुझुकी इन्व्हिक्टो
मारुती सुझुकी इन्व्हिक्टो ही प्रीमियम MPV देखील हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 23.24किमी मायलेज देते. यात 52 लिटर क्षमतेची फ्यूल टँक देण्यात आली आहे. त्यामुळे ही कार फुल टँकवर सुमारे 1,208 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
टीप : वरील रेंज आणि मायलेज हे कंपन्यांनी दिलेल्या दाव्यांवर आधारित अंदाज आहेत. प्रत्यक्ष मायलेज आणि रेंज ड्रायव्हिंगची पद्धत, रस्त्यांची स्थिती, वाहतूक आणि एसीच्या वापरानुसार बदलू शकते.