Driving License Update | सरकारची नवी योजना, आता Aadhaar कार्डनेच पूर्ण होणार वाहन परवान्याची कामे!

| Updated on: Feb 12, 2021 | 11:49 AM

आधार प्रमाणीकरण बनावट परवाने वापरणाऱ्यांवर बंदी आणेल आणि कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त वाहनचालक परवाना वापरण्यास सक्षम राहणार नाही.

Driving License Update | सरकारची नवी योजना, आता Aadhaar कार्डनेच पूर्ण होणार वाहन परवान्याची कामे!
वाहन परवाना
Follow us on

मुंबई : देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्डबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि हे कार्ड सरकारी तसेच इतर सेवांशी देखील जोडले जात आहे. अलीकडेच रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये वाहन मालक संपर्क रहित अर्थात कॉन्टॅक्ट लेस सेवा घेऊ शकतात. याशिवाय परिवहन विभागाचे काम रांगा लावून करण्याऐवजी आधार आधार वापरून सोप्या पद्धतीने करण्यास ते सक्षम असतील (Driving License Update Aadhaar Card for online services).

या मसुद्यामध्ये परवाना मिळवणे, डीएलचे नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवान्यासह वाहन कागदपत्रांचे हस्तांतरण करणे यासह 16 अन्य सेवांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी आधारचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल.

त्यानुसार या पोर्टलमार्फत ज्यांना कॉन्टॅक्ट लेस सेवा मिळवायच्या आहेत, त्यांना आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. या नियमांसह, आधार प्रमाणीकरण घरच्या घरी देखील केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आधार प्रमाणीकरणासाठी कुठे जाण्याची इच्छा नसल्यास, अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांना वैयक्तिकपणे कार्यालयात जावेच लागेल.

बनावट परवान्यावर बंदी घालण्यात येईल!

आधार प्रमाणीकरण बनावट परवाने वापरणाऱ्यांवर बंदी आणेल आणि कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त वाहनचालक परवाना वापरण्यास सक्षम राहणार नाही. याचे स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोक ऑनलाईन सेवांसाठी अधिक पर्याय निवडत आहेत आणि आम्ही ते जास्तीत जास्त वापरले जाईल, अशी अपेक्षा करतो.

याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचा विचारही सरकार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अशी तरतूद करत आहे की, वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करताना कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की आपण ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रावरून वाहन चालवणे शिकल्यास परवान्यासाठी आपल्याला कोणतीही चाचणी देण्याची आवश्यकता नाही. सरकारने या योजनेवर काम सुरू केले आहे (Driving License Update Aadhaar Card for online services).

ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही!

वाहन परवाना या विषयाकडे आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत, ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. यामध्ये आता नागरिकांसाठी आणखी सोयीच्या योजना आखण्यात येत आहेत. सरकार आता यामध्ये आणखी एक मोठा बदल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देणं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.

म्हणजेच काय तर जर तुम्हाला ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असाल तर परवाण्यासाठी तुम्हाला टेस्ट देण्याची काही गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात या खास योजनेवर काम सुरू असून मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, ग्राहकांना सल्ला विचारला जाणार आहे.

(Driving License Update Aadhaar Card for online services)

हेही वाचा :