याला म्हणतात दिवाळी ऑफर, या इलेक्ट्रिक कारवर मिळतेय 3.35 लाख रुपयांची सूट
दिवाळीपूर्वी इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, या इलेक्ट्रिक कारवर मिळतेय तब्बल 3.35 लाख रुपयांपर्यंत सूट. एका चार्जमध्ये धावते 502 किमी अंतर. काय आहे ऑफर?

दिवाळीचा सण जवळ येताच वाहन कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात Tata Motors आणि MG Motor या कंपन्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारवर मोठ्या सवलती मिळत आहेत. विशेष म्हणजे, काही इलेक्ट्रिक कारवर तब्बल 3.35 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. त्यामुळे नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी ठरू शकते.
Tata Curvv EV
Tata Motors आपल्या कूपे स्टाइल इलेक्ट्रिक SUV Curvv EV वर सर्वाधिक डिस्काउंट देत आहे. या कारच्या प्री-सीरीज X व्हेरिएंटवर एकूण 3.35 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत.
यामध्ये 3 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 35 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. तर सीरीज X व्हेरिएंटवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 17.19 लाख ते 19.69 लाख रुपये आहे.
Tata Harrier EV
Tata ची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV Harrier EV वरही आकर्षक दिवाळी ऑफर मिळत आहे. या कारच्या Fearless+ आणि Empowered व्हेरिएंटवर 2.75 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
यामध्ये 1 लाख रुपयांचा विशेष ऑफर डिस्काउंट, 75 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस आणि 1 लाख रुपयांपर्यंत लॉयल्टी इन्सेंटिव्हचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 21.79 लाख ते 30.54 लाख रुपये आहे.
MG ZS EV
MG Motor आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिक SUV ZS EV वर 2.70 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. Exclusive Plus आणि Essence व्हेरिएंटवर ही ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये 2.15 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, 20 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि जुन्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपयांचा रेफरल बोनस मिळू शकतो. याशिवाय 25 हजार रुपये किमतीचा चार्जरही मोफत दिला जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख ते 20.75 लाख रुपये आहे.
ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!
या सर्व ऑफर्स शहर, डीलरशिप, व्हेरिएंट आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकतात. विशेषतः जुन्या स्टॉकवरील सवलती मर्यादित गाड्यांसाठी लागू असू शकतात. तसेच कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस आणि इतर ऑफर्ससाठी वेगवेगळ्या अटी असू शकतात.