
प्रत्येक दुचाकीस्वार किंवा रायडरसाठी बाईक चालवताना हेल्मेट घालणं गरजेचे असते. तर आपल्यापैकी कित्येक लोकं रोज हेल्मेट वापरतात. ज्याप्रमाणे आपण नियमितपणे आपल्या कार किंवा बाईक स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे हेल्मेट स्वच्छ करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वारंवार हेल्मेट वापरून धूळ, घामामुळे हेल्मेटच्या आत केवळ दुर्गंधच येत नाही तर हेल्मेटची गुणवत्ता देखील लवकर खराब करते. बरेच लोकं हेल्मेट स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच हेल्मेट वेळोवेळी स्वच्छ केल्याने घालण्यास आरामदायक बनते. तर आजच्या लेखात आपण हेल्मेट पूर्णपणे स्वच्छ कसे करता येईल याचे पाच सोपे टिप्स जाणून घेऊयात.
हेल्मेट स्वच्छ करण्याचे सोपे मार्ग:
1. हेल्मेटचा बाहेरील भाग स्वच्छ करणे
प्रथम, हेल्मेट कोमट पाण्यात भिजवा. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने हळूवारपणे हेल्मेटवरील पाणी पुसून काढा. जर काही डाग असतील तर ओल्या टिश्यू पेपर या डागांवर 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर हळूवारपणे पुसून काढा. शेवटी संपूर्ण हेल्मेट कोरड्या कापडाने पुसून टाका जेणेकरून ते चमकेल.
२. एअर व्हेंट्स साफ करणे
वारंवार हेल्मेट वापरल्याने त्यात धूळ जमा होऊ शकते. मोठे व्हेंट्स साफ करण्यासाठी कापडाच्या कोपऱ्याने आणि लहान व्हेंट्स टिशू किंवा इअरबडने स्वच्छ करा. जास्त जोरात एअर व्हेंट्स साफ करू नका अशाने मॅकेनिज्म तुटू शकतात.
3. हेल्मेटच्या आतील पॅड्स स्वच्छ करणे
पॅड्स हे हेल्मेटचा सर्वात महत्वाचा भाग आहेत. प्रथम पॅड्स स्वच्छ करण्यासाठी पॅड्स कोमट पाण्यात आणि सौम्य साबणात 1 तास ठेवा व त्यानंतर स्वच्छ करा. तसेच पाण्याखाली हळूवारपणे हाताने पुर्णपणे धुवून सावलीत सुकवा. जर तुमच्याकडे असलेले हेल्मेट पॅड्स काढता येण्याजोगे लाइनर असेल तर ते मशीनमध्ये सौम्य पद्धतीने देखील धुता येतात.
4. हेल्मेट व्हिझर साफ करणे
व्हिझर कोमट पाण्याने धुवा. हट्टी डागांसाठी ओल्या टिश्यू पेपरचा वापर करा. व्हिझरवर स्क्रॅच पडू नये यासाठी मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा.
5. व्हिझर मॅकेनिज्म साफ करणे
ओल्या कापडाने यंत्रणेतील कोणतीही धूळ पुसून टाका. लहान भागांसाठी टिशू किंवा इअरबड वापरा. काढता येण्याजोग्या यंत्रणा असलेल्या व्हिझरसाठी पाण्यात स्वच्छ धुवा आणि सुकवा. तसेच मॅन्युअलमधील सूचनांचे नेहमी पालन करा.
तुम्ही तुमचे हेल्मेट किती वेळा स्वच्छ करावे?
धूळ, घाम आणि प्रदूषण यामुळे हेल्मेट खराब होऊ शकतात. उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा आणि इतर ऋतूंमध्ये महिन्यातून एकदा हेल्मेट स्वच्छ करावे. नियमित स्वच्छतेमुळे हेल्मेट चांगले दिसते आणि त्याची सुरक्षितता वाढते. अस्वच्छ हेल्मेट लवकर खराब होते आणि त्याची सुरक्षितता कमी होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)