Ather e-scooter च्या सिंगल चार्जवर मिळवा 146 km पर्यंतची रेंज, बॅटरीच्या साईजमध्येही बदल

सध्या एथर 450 प्लससाठी 116km च्या रेंजचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एथर 450 एक्ससाठी 100km रेंजचा दावा करण्यात येत आहे. परंतु मोठी बॅटरी पॅक लावण्यात आल्याने या रेंजमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठी बॅटरी लावल्यामुळे एथर 450 प्लसची रेंज वाढून 146km पर्यंत तर एथर 450 एक्सची रेंज देखील वाढून 108km होउ शकते.

Ather e-scooter च्या सिंगल चार्जवर मिळवा 146 km पर्यंतची रेंज, बॅटरीच्या साईजमध्येही बदल
डिस्पॅच इलेक्ट्रिक स्कूटर (File photo)
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 12:14 PM

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप (Two-wheeler startup) कंपनी एथर आपल्या दोन ब्रँड न्यू ई-स्कूटरमध्ये मोठ्या बॅटरी पॅकचा वापर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लिक झालेल्या माहितीनुसार, कंपनी यापुढे एथर 450 प्लस (Ather 450 plus) आणि 450 एक्स ई-स्कूटरला मोठ्या बॅटरी पॅकसह सादर करण्याची चर्चा आहे. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या साइजमध्येही बदल करण्यात आले आहे. एका माहितीनुसार, मोठी बॅटरी पॅक फीट करण्यासाठी एथर इलेक्ट्रिक स्कूटरच्या साइजमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. ई-स्कूटरमध्ये (e-scooter) रेंजला अधिक महत्व असते. त्यामुळे अनेक ई-स्कूटर उत्पादक कंपन्या आपल्या बाईकला जास्तीत जास्त रेंज मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून एथरनेही आपल्या बाईकमध्ये असे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, की एथरने आपल्या बाईकमध्ये नेमके काय बदल केले आहेत.

Ather 450 मिळेल मोठी बॅटरी

कोणत्याही इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिची बॅटरी असते. ओला S1 सोबत चांगली स्पर्धा करण्यासाठी एथर 450 चे अपडेट व्हर्जन लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या 450 एक्सच्या बॅटरी पॅकची माहिती लिक झाली आहे. कंपनी एथर 450 एक्स इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये असलेल्या 2.9kWh च्या जागी 3.66kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकचा वापर करु शकते.

रेंजमध्ये होणार वाढ

सध्या एथर 450 प्लससाठी 116km च्या रेंजचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एथर 450 एक्ससाठी 100km रेंजचा दावा करण्यात येत आहे. परंतु मोठी बॅटरी पॅक लावण्यात आल्याने या रेंजमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठी बॅटरी लावल्यामुळे एथर 450 प्लसची रेंज वाढून 146km पर्यंत तर एथर 450 एक्सची रेंज देखील वाढून 108km होउ शकते.

साइजमध्ये होणार बदल

एथरच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या साइज तसेच डायमेंशनमध्येही काही बदल करण्यात येणार आहेत. व्हीलबेस 9mm वाढीसह 1296 mm होणार आहे. ई-स्कूटरची हाइट सध्याच्या 1103mm च्या जागी 1114mm होणार आहे. सर्वात मोठा बदल स्कूटरच्या लांबीमध्ये 25mm च्या वाढीसह होणार आहे. यासह ग्राहकांना यात अनेक बदल बघायला मिळणार आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें