मोफत गाडीचं सर्व्हिसिंग करुन घ्या, Mahindra कडून ग्राहकांना शानदार संधी

| Updated on: Feb 17, 2021 | 4:01 PM

Mahindra कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी देशभरात एका फ्री मेगा सर्व्हिस कँपची घोषणा केली आहे. (Mahindra Service Campaign)

मोफत गाडीचं सर्व्हिसिंग करुन घ्या, Mahindra कडून ग्राहकांना शानदार संधी
या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार
Follow us on

मुंबई : Mahindra कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी देशभरात एका फ्री मेगा सर्व्हिस कँपची घोषणा केली आहे. यामध्ये बोलेरो (Bolero), स्कॉर्पियो (Scorpio), XUV500, Marazzo, Alturas G4, XUV300 TUV300, KUV100, Xylo, Nuvosport, Quanto, Verito, Verito Vibe, लोगन (logan), रेक्सटन (Rexton) आणि थार (Thar) या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. (car serviced for free, M-Plus Mega Service, mahindra, Mahindra Service Campaign)

कंपनीचा एम-प्लस मेगा सर्व्हिस कॅम्प हा देशातील सर्व प्रमुख शहरांमधील तब्बल 600 अथोराइज्ड वर्कशॉप्समध्ये 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत सुरु राहील. या उपक्रमामुळे महिंद्राच्या वाहनधारकांना त्यांची वाहने उत्तम स्थितीत आहेत किंवा नाही, याबाबतची खात्री करुन घेण्याची संधी मिळेल. ट्रेंड टेक्नीशियनच्या माध्यमातून ग्राहक प्रत्येक वाहनावरील सविस्तर 75-पॉइंट चेकचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय महिंद्राकडून ग्राहकांना वाहनांच्या सुट्या भागांवर (स्पेयर पार्ट्स) 5 टक्के, लेबरवर 10 टक्के आणि मॅक्सिकेयर ट्रीटमेंटवर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे केवळ दोन दिवस आहेत.

WhatsApp द्वारे बुकिंग

ग्राहक WhatsApp वर कार सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करु शकतात. ‘महिंद्रा विथ यू हमेशा’ च्या WhatsApp अकाउंटवर मसेज करुन अथवा ‘विथ यू हमेशा’ या अॅपद्वारे किंवा महिंद्राच्या वेबसाईटवरुन तुम्ही कार सर्विस अपॉइंटमेंट बुक करु शकता. सोबतच ट्रबल फ्री पिक अँड ड्रॉप सर्विसचा लाभ घेण्यासाठी मॅक्सिकेयर ट्रीटमेंट सिलेक्शनसह स्वतःचं जॉब कार्डही बनवू शकता.

WhatsApp द्वारे कस्टमर रिपेयर ऑर्डरला अप्रूव्हल दिलं जाईल. तसेच ग्राहक त्यांच्या कार सर्व्हिसिंगबाबतची माहिती ट्रॅक करु शकतात. रिपेयर इनव्हॉईस पाहू शकतात तसेच वर्कशॉपमध्ये स्टेशनरी किंवा पीओएस मशीनशिवाय ‘विथ यू हमेशा’ अॅपद्वारे पेमेंटही करु शकतात. महिंद्राने “CustomerLIVE” सादर केलं आहे. ही एक लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे, याद्वारे सर्व्हिस अॅडवायजर ग्राहकांना त्यांच्या गाडीच्या रिपेअरिंगबाबत इस्टीमेट सांगू शकतील.

हेही वाचा

Volkswagen च्या लोकप्रिय Polo आणि Vento चं टर्बो एडिशन लाँच, स्पोर्टी लुकसह किंमतही कमी

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?

(car serviced for free, M-Plus Mega Service, mahindra, Mahindra Service Campaign)