देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) मोठा फटका बसला आहे.

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

मुंबई : गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मारुतीची निर्मिती आणि विक्री प्रभावित झाली आहे. जानेवारीत कंपनीचे उत्पादन 10 टक्क्यांनी घसरले आहे. याचा कंपनीच्या वाहनविक्रीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीची चिंता वाढली आहे. (Maruti Suzuki New plan after 10 pc decline in sales in January)

मारुती सुझुकीने 2021 मध्ये एकूण 1,60,975 वाहने तयार केली. तर, जानेवारी 2020 मध्ये मारुतीने एकूण 1,79,103 वाहनांची निर्मिती केली होती. जानेवारी 2020 च्या तुलनेत कंपनीच्या उत्पादनात जानेवारी 2021 मध्ये 10 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या देशांतर्गत बाजारातील विक्रीत 0.6 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने 139,844 युनिट्सची विक्री केली होती. तर यंदा 139,002 युनिट्सची विक्री केली आहे. लहान कारच्या सेगमेंटमध्येदेखील (मिनी प्लस कॉम्पॅक्ट) 7.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मारुतीच्या ए-सेगमेंट (एंट्री लेवल) मिनी कार्सच्या (अल्टो, एस-प्रेसो) विक्रीत 2.8 घट नोंदवण्यात आली आहे. कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 25,885 गाड्यांची विक्री केली होती. दुसऱ्या बाजूला मारुतीची निर्यात मात्र वाढली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीने 12,345 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे.

मारुतीचा नवा मास्टर प्लॅन

कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या वॅगनआर, स्विफ्ट, डिजायर, बलेनो, इग्निस आणि सेलेरिओ या मारुतीच्या काही लोकप्रिय मॉडेल्सचीही विक्री जानेवारी 2021 मध्ये घसरली आहे. या खराब कामगिरीनंतर मारुती सुझुकीने त्यांची विक्री वाढवण्यासाठी नवी योजना आखली आहे.

कंपनी नवीन आणि प्रीमियम हॅचबॅक मॉडेल्स, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि अगदी मल्टीपरपस व्हीकल प्रोडक्ट्स (बहुउद्देशीय वाहन उत्पादने) सादर करणार आहे. कंपनी आपल्या मॉडेलचे डिझाइन आणि पोर्टफोलिओ अधिक मजबूत करणार आहे, जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल.

प्रवासी वाहनांच्या उत्पादनात घट

जानेवारी 2021 मध्ये मारुतीने एकूण 1,56,439 प्रवासी वाहनांची निर्मिती केली. तर, जानेवारी 2020 मध्ये मारुतीने 1,76,598 प्रवासी वाहने तयार केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पादनात यंदा जानेवारी महिन्यात 11.4 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.

Alto और S-Presso च्या उत्पादनात 19.3% घट

मारुती सुझुकीच्या अल्टो (Alto) आणि एस-प्रेसो (S-Presso) यांसारख्या मिनी कारचे उत्पादन 19.3 टक्क्यांनी कमी झाले आहे. जानेवारी 2021 मध्ये या कारच्या 27,665 युनिट्सची निर्मिती झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 34,288 युनिट्सची निर्मिती करण्यात आली होती.

कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्येही घट

कंपनीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्येही घट झाली आहे. कंपनीच्या Dzire, Swift, Ignis, Baleno, WagonR, आणि Celerio यांसारख्या मोटारींचे उत्पादन 19.2 टक्क्यांनी घसरले. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 1,06,803 युनिट्सचे उत्पादन झाले होते तर जानेवारी 2021 मध्ये या कारच्या 86,282 युनिट्सचे उत्पादन झाले आहे.

यासह जानेवारी 2021 मध्ये Eeco व्हॅनचे उत्पादन वर्षाकाठी 19.6 टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी 2021 मध्ये, मारुतीने 11,769 इको व्हॅन तयार केल्या. तर जानेवारी 2020 मध्ये 14,639 वाहनांची निर्मिती झाली होती.

‘या’ सेगमेंटने तारले

एका बाजूला मारुती सुझुकीच्या एंट्री लेव्हल आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये घट दिसून आली. त्याच वेळी, सेडान सेगमेंटमध्ये 89 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये Ciaz च्या 806 मोटारींचे उत्पादन झाले होते तर जानेवारी 2021 मध्ये कंपनीने Ciaz च्या 1,524 युनिट्सची निर्मिती केली आहे. या व्यतिरिक्त, युटिलिटी विभागातील जिप्सी (Gypsy), विटारा ब्रेझा (Vitara Brezza), अर्टिगा (Ertiga), एक्सएल 6 (XL6 ) आणि एस-क्रॉस (S-Cross) सारख्या वाहनांच्या उत्पादनात वर्षाकाठी 45.5% वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने या वाहनांच्या 29,199 युनिट्सची निर्मिती केली आहे. तर, जानेवारी 2020 मध्ये 20,062 युनिट्सची निर्मिती करण्यात आली होती.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत

(Maruti Suzuki New plan after 10 pc decline in sales in January)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI