
Maruti Suzuki : सणासुदीच्या दिवसात बाजारात खरेदी वाढला आहे. त्यात २२ सप्टेंबर पासून नवीन जीएसटी दर लागल्याने यात खरेदीला आणखीनच उधान आले आहे. जीएसटी कार कपातीचा फायदा कार खरेदीवर झाला आहे. मारुती कारमध्ये सर्वाधिक विक्री सुरु झाली आहे. कारण मारुतीच्या कारचे भाव खूपच कमी झाले आहेत. त्यातच कंपनीने अशी तगडी ऑफर दिली आहे की लोक दुचाकी सोडून कार खरेदी करु लागले आहेत.
नवरात्री सुरु झाल्यानंतर आतापर्यंत ८० हजाराहून अधिक मारुती कार विकल्या गेल्या आहेत. एवढेच नाही रोज किमान ८० हजार लोक नव्या कार संदर्भात चौकशी करत आहेत. शोरुममध्ये एवढी गर्दी झाली आहे की रात्री ११ -१२ पर्यंत कारची डिलीव्हरी होत आहे. जीएसटी लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मारुती सुझुकीने ३५ वर्षांचा रेकॉर्ड तोडला होता आणि एकाच दिवशी २५,००० कारची डिलिव्हरी केली होती.
बिझनेस टुडेशी बोलताना मारुती सुझुकीचे सेल्स आणि मार्केटिंग अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की कंपनीने नवरात्रीच्या सुरुवातीनंतर आता पर्यंत ८० हजार कारची विक्री केली आहे. तर रोज तेवढेच लोक फोन करुन चौकशी करत आहेत. आमच्या शोरुममध्ये उभा राहायला जागा नाही. रात्री उशीरापर्यंत कारची डिलिव्हरी होत आहे.
केवळ १,९९९ रुपयांचा ईएमआयची ऑफर दिली जात असल्याने लोक दुचाकी सोडून चारचाकीकडे वळत आहेत. कंपनीला माहिती आहे की भारतात दोन कोटी दुचाकी ग्राहक आहेत. त्यांना थोडा धक्का दिला पाहिजे.त्यासाठी ईएमआयची ऑफर आणण्यात आली आहे. कारना स्वस्त करण्यासाठी मारुती सुझुकीने शानदार ईएमआय ऑफर आणली आहे. ग्राहकांना केवळ १,९९९ रुपये प्रति महिन्याचा हप्ता देऊन लोक कार खरेदी करत आहेत. बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की,यामुळे दुचाकी वाहनांच्या मालकांसाठी चार चाकीत अपग्रेड होणे सोपे झाले आहे.
कंपनीने छोट्या कार सेगमेंटमधील विक्री घसरण्याची कारणेही सांगितली. याचा थेट कारण कंपनीच्या खिशाला पडणारा भार मानले जात आहे. पार्थो बॅनर्जी म्हणाले की छोट्या कारच्या विक्रीत घसरण प्रामुख्याने अफॉर्डेबिलिटी संबंधितीच्या आव्हानामुळे झाली आहे, ते म्हणाले अलिकडे रेपो रेटमध्ये झालेली कपातीने ईएमआयला आणखी किफायती बनवण्यास मदत मिळाली. ते पुढे म्हणाले की मारुतीने निवडक एंट्री लेव्हल मॉडेलची किंमतीत २४ टक्के कमी केली आहे, जी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असेल.