
हार्ले डेविडनस इंडियाने गेल्या काही वर्षात भारतीय बाजारात घट्ट पाय रोवले आहेत. आता प्रिमियम क्रुझर बाइक्सच्या रेंजला प्रोत्साहन देत 2025 स्ट्रीट बॉब लाँच केली आहे. भारतात लाँच केलेल्या या बाइकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स दिले आहेत. तसेच नव्या इंजिनसह लाँच केली आहे. या बाइगमध्ये 117 सीआय इंजिन आहे. यापूर्वी हे इंजिन मोठ्या हार्ले बाइक्समध्ये दिली आहे. या बाइकचा लूक आकर्षक असून मागच्या बाइकसारखाच आहे. यात क्लासिक लाइन्स आणि लो स्टांस कायम आहे. राउंड हेडलँप, पुढे वाकलेली फ्रंट सस्पेंशन आणि मिनी एप हँगर आहे. त्यामुळे या बाइकला खऱ्या अर्थाने क्रुझर लूक येतो. नव्या बाइकला टू इन वन लाँगटेल एग्जॉस्ट पाइप दिला आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये ब्लॅक फिनिश टू इन टू एग्जॉस्ट होता. या गाडीची एक्स शोरूम किंमत 18.77 लाख रुपये आहे.
या बाइकमध्ये 1923 सीसी व्ही ट्वीन एअर आणि लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे. या इंजिनने जुन्या मिलवॉकी एट 107 सीआय मोटरची जागा घेतली आहे. या इंजिनमुळे 90 बीएचपी पॉवर 5020 आरपीएमवर आणि 156 एनएम टॉर्क 2750 आरपीएमवर मिळतो. यात 6 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. पुढे 49 एमएम नॉन एडजेस्टेबल टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे प्रीलोड एडजस्टेबल मोनोशॉक दिला आहे. बाइकला फ्रेम ट्युबलर क्रॅडल चेसिस दिली आहे. तसेच दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स दिले आहेत. 117सीआय इंजिन असलेल्या नवीन हार्ले बाइक्समध्ये ही सर्वात हलकी मोटरसायकल आहे.
नव्या स्ट्रीट बॉबमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक फीचर्स दिले आहेत. यात तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात स्पोर्ट, रोड आणि रेन असे तीन पर्यात आहेत. तसेच ट्रॅक्शन कंट्रोलसाठी ड्यूल चॅनेल एबीएस विथ कॉर्नरिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, ड्रॅग टॉर्क स्लिप कंट्रोल फीचर्स दिलं आहे. तसेच सेमी अनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिजिटल रीडआऊट दिलं आहे.