टाटाच्या एसयुव्हीने ऑटोक्षेत्रात गेम केला पलटी, एका वर्षात 44 हजार लोकांची पसंती
टाटा मोटर्सने मागच्या काही वर्षात बाजारात एकापेक्षा एक सरस गाड्या आणल्या आहेत. मागच्या वर्षी लाँच केलेली कार कमी अवधीतच लोकप्रिय झाली. या गाडीत अशी काय खासियत आहे की लोकांची यासाठी झुंबड उडाली आहे. जाणून घ्या कारण...

भारतीय कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने मागच्या वर्षी कर्व्ह एसयुव्ही बाजारात लाँच केली होती. टाटा कर्व्ह एसयूव्ही-कूपने देशांतर्गत बाजारात एक वर्ष पूर्ण केले आहे. बघता या गाडीची मागणी दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या एका वर्षात 44 हजार लोकांनी ही गाडी विकत घेतली आहे. विशेष म्हणजे ही कूप एयुव्ही पेट्रोल किंवा डिझेलच नाही तर इलेक्ट्रिक प्रकारातही आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिक अवतारात आणि 2 सप्टेंबर 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेल इंजिन प्रकारात लाँच करण्यात आली होती. कर्व्हमध्ये सेगमेंट-फर्स्ट पॉवर्ड टेलगेट, 18-इंच अलॉय व्हील्स, फ्लश डोअर हँडल, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, रिक्लाइनिंग रीअर सीट आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आहेत. त्यामुळे गाडीची मागणी वाढली आहे. ही गाडी टाटाच्या एकूण पॅसेंजर गाड्यांच्या विक्रीत 8 टक्के सहभाग नोंदवते. त्यामुळे या गाडीची लोकप्रियता लक्षात येते. कर्व गाडी युनिक डिझाईन आणि जबरदस्त फीचर्ससाठी पसंत केली जात आहे.
कर्व्ह एसयूव्हीचे एकूण 50 प्रकार आहे. त्यात 24 पेट्रोल, 18 डिझेल आणि 8 इलेक्ट्रिक मॉडेल आहेत. या गाडीच्या बेस मॉडेल 1.2 स्मार्ट पेट्रोल प्रकाराची सुरुवात 10 लाख रुपयांपासून होते आणि टॉप-एंड 1.5 अकम्प्लिश्ड + ए डार्क डीसीटी डिझेल प्रकाराची सुरुवात 19.52 लाख रुपयांपर्यंत होते. कर्व्ह ईव्हीची सुरुवात 17.49 लाख रुपयांपासून होते आणि टॉप मॉडेलची सुरुवात 22.24 लाख रुपयांपर्यंत एक्स शोरूम जाते. कर्व्ह 2 पेट्रोल आणि 1 डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तिन्ही इंजिनमध्ये सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे, तर 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक पर्याय देखील उपलब्ध आहे.
कर्व्ह ईव्हीमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. 40.5 किलोवॅट आणि 55 किलोवॅट असे दोन प्रकार आहेत. छोट्या बॅटरीतून 502 किमी रेंज मिळते. तर मोठ्या बॅटरीमुळे 582 किमी रेंट मिळते. त्यामुळे या दोन्ही बॅटरीत कंपनीच्या दाव्यानुसार 80 किमीचा फरक दिसून येतो. ही गाडी 8.6 सेकंदात 0 ते 100 किमी ताशी स्पीड पकडते. या गाडीचा टॉप स्पीड 160 किमी प्रतीतास आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, 70 किलोवॅट चार्जरवर ही गाडी फक्त 70 किलोवॅट चार्जरवर 15 मिनिटात 150 किती चालेल इतकी चार्ज होते. 40 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज होईल. सुरक्षिततेसाठी या गाडीत 6 एअरबॅग्ज, लेव्हल 2 ADAS, ESC, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, TPMS, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि बरेच काही समाविष्ट आहे.
