महिंद्रा कंपनीकडून चार कॉन्सेप्ट एसयुव्ही सादर, कसं काय असेल ते जाणून घ्या
महिंद्रा कंपनीने भविष्याचा वेध घेत चार कॉन्सेप्ट एसयुव्ही सादर केल्या आहेत. डिझाईन आणि इंजीनियरिंगचं नवं मानक या माध्यमातून स्थापित करण्याची तयारी सुरु झाली आहे. या कॉन्सेप्ट एसयुव्हीच्या माध्यमातून महिंद्रा इलेक्ट्रिक आणि जागतिक बाजारावर डोळा ठेवून आहे.

महिंद्राने चार कॉन्सेप्ट एसयुव्ही सादर केल्या आहेत. त्यामुळे एयुव्हीप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. व्हिजन एक्स, व्हिजन टी, व्हिजन एस आणि व्हिजन एसएक्सटी या चार कॉन्सेप्ट एसयुव्ही आहेत. कंपनीने स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत फ्रीडम एनयू कार्यक्रमात हे मॉडेल सादर केले. या चार एसयुव्ही वेगवेगळ्या थीमवर आधारीत असून एका प्लॅटफॉर्मवर विकसित केल्या जातील. या प्लॅटफॉर्मला महिंद्रा कंपनीने एनयू.आयक्यू असं नाव दिलं आहे. येत्या येत्या काळात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी येणाऱ्या सी सेगमेंट वाहनांमध्ये नवीन प्लॅटफॉर्म वापरले जाईल. कंपनीचे सध्याचे लक्ष केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर नाही तर जागतिक एसयूव्ही विभागात पाय रोवणे आहे. वेगवेगळ्या डिझाइन, विभाग आणि वैशिष्ट्ये असूनही त्यांना एकाच व्यासपीठावर बांधल्याने उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण कमी होण्यास मदत होईल .

व्हिजन टी आणि व्हिजन एसएक्सटी : या दोन कॉन्सेप्ट कार सादर करण्यापूर्वी कंपनीने टीझरच्या माध्यमातून हिंट दिली होती. दोन्ही कार थार ई संकल्पनेने प्रेरित असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिजन टीला क्लासिक बॉक्सी आकार दिला गेला आहे. तर व्हिजन एसएक्सटीला पिकअप ट्रकसारखे केबिन दिलं आहे. हे स्पेअर व्हील डेकवर ठेवलं आहे. त्यामुळे या एसयुव्ही आकर्षक दिसत आहेत. दोन्ही मॉडेल ऑफ रोडिंगसाठी मजबूत आहेत. या एसयुव्ही बाजारात येण्यापू्र्वी त्यात काही बदल शक्य आहेत.

व्हिजन एस : या एसयुव्हीची आयाताकृती पॅटर्नमध्ये बसेल अशी डिझाईन केली आहे. त्याचा पुढचा भाग आधुनिक आणि स्टायलिश दिसतो. ट्विन पीक्स लोगोच्या दोन्ही बाजूंना उभ्या एलईडी दिवे आणि एल – आकाराचे हेडलॅम्प दिला आहे. त्यामुळे ही गाडी अधिक आकर्षक दिसते. ऑफ रोडिंगसाठी छतावरील दिवे , सॉलिड बंपर , साइड प्लास्टिक क्लॅडिंग आणि मोठे व्हील आर्च दिले आहेत. फ्लश डोअर हँडल , स्लीक ओआरव्हीएम आणि नवीन अलॉय व्हील डिझाइन या कारला एक अतिशय प्रीमियम टच देतात .

व्हिजनएक्स : या गाडीचं डिझाईन देखील आकर्षक आहे. या गाडीला स्लिम हेडलॅम्प, स्लीक एअर इनटेक आणि एक लांबलचक हुड आहे. त्यामुळे ही गाडी स्पोर्टी वाटते. फ्लश प्रकारचे डोअर हँडल आणि ड्युअल टोन रिअर बंपर त्यामुळे ही एसयुव्ही अधिक आकर्षक दिसते.
