BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयुव्हीचा फस्ट लूक पाहिलात काय? फूल चार्जवर 400 किमीची रेंज

| Updated on: Sep 10, 2022 | 5:31 PM

BYD ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी सध्या भारतात e6 MPV ची विक्री करत आहे. कंपनी लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV BYD Atto 3 दाखल करणार आहे. BYD ने अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचा टीझर व्हिडिओ रिलीज केला असून कंपनीच्या दाव्यानुसार, BYD Atto 3 ची रेंज 400 किमी असेल.

BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयुव्हीचा फस्ट लूक पाहिलात काय? फूल चार्जवर 400 किमीची रेंज
Follow us on

मुंबई : बीवायडी इंडियाने (BYD India) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयुव्हीचा पहिला टीझर व्हिडिओ जारी केला आहे. परंतु टीझर व्हिडिओमध्ये LED DRLs वगळता अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीबाबत अधिक माहिती जाणून घेता आलेली नाही. सध्या BYD ने Atto 3 भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, रिपोर्ट्सनुसार अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही (Electric SUV) लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. BYD Atto3 ची संभाव्य एक्सशोरूम किंमत 25 ते 35 लाखांपर्यंत असू शकते. या लेखातून त्याचे फीचर्स (Features) व किमतीविषयक माहिती घेणार आहोत.

BYD Atto 3 SUV ची संभाव्य किंमत

अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही BYD Atto 3 सेमी-नॉक डाउन (SKD) व्हेरियंटद्वारे भारतात येत असल्याने त्याची किंमत जास्त असेल, अशी शक्यता आहे. MG ZS EV आणि Hyundai Kona Electric सारख्या इलेक्ट्रिक कारशी अपकमिंग कार स्पर्धा करुन त्याची किंमत 25 ते 35 लाखांच्या दरम्यान राहणार आहे. Atto 3 इलेक्ट्रिक कार एसयुव्ही सारखी दिसते.

BYD Atto 3 ची इलेक्ट्रिक मोटर

अपकमिंग एसयुव्ही परमनेंट मेग्नेट सिंक्रोनॉस मोटरसह येईल. ही एसयूव्ही कार फक्त 7.3 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग धारण करु शकते. BYD Atto 3 चे वजन 1,680-1,750 किलो असल्याने ही तिची चांगली कामगिरी मानली जात आहे. BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि कोना इलेक्ट्रिक या दोन्ही प्रतिस्पर्धी इलेक्ट्रिक कार्सपेक्षा पॉवरच्या बाबतीत चांगली आहे.

व्हेरिएंट

BYD Atto 3 दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. यामध्ये, 49.92 kWh बॅटरी पॅक असलेली इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 320 किमी अंतर कापू शकते. त्याच वेळी, 60.48 kWh बॅटरी पॅकमधून पूर्ण चार्ज केल्यानंतर, 420 किमी ड्रायव्हिंग करता येते. BYD Atto 3 चे रेंज आकडे WLTP सायकलच्या आधारावर दिले आहेत. भारतात कोणता बॅटरी पॅक येईल याची सध्या माहिती उपलब्ध नाही.