
Hero MotoCorp ने अनेक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. विविध सेगमेंटमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी खास योजना आखली आहे. घरगुती दुचाकी ब्रँड अजून एक दुचाकी लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नवीन 125cc मोटारसायकलसाठी 19-20 ऑगस्ट 2025 रोजी ‘ब्लॉक योर डेट’ चे निमंत्रण दिले आहे. यावेळी Hero Glamour 125 नवीन स्वरुपात लाँच होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीकडे अगोदरच Super Splendor, Glamour, आणि Xtreme 125R स्वरुपात तीन 125cc बाईक आहेत. त्यामुळे Glamour 125 चे नवीन व्हर्जन बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारसारखे क्रूज कंट्रोल फिचर
काही आठवड्यांपूर्वी अपडेटेड Hero Glamour ची स्पाई इमेज इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. Hero Glamour च्या चाचणी बाईकमध्ये कारसारखे क्रूज कंट्रोल फिचर मिळेल. जास्त पॉवरफुल इंजिन असेलल्या काही बाईक्समध्ये हे फीचर उपलब्ध आहे. कम्यूटर बाईकमध्ये हे फीचर जोडणे Hero MotoCorp चे एक मोठे पाऊल मानण्यात येत आहे. या सेगमेंटमध्ये असे फीचर आणणारी ही पहिली बाईक असेल.
काय होईल क्रूज कंट्रोलचा फायदा
क्रूज कंट्रोलमुळे दुचाकी स्वाराला बाईकचा स्पीड सेट करता येईल. कोणत्याही रस्त्यावर एका वेगाने दुचाकी चालवता येईल. या बाईकमध्ये क्रूज कंट्रोल टॉगल बटन उजव्या बाजूला स्विचगिअरवर इग्निशन बटणाच्या खाली इंटिग्रेट करण्यात आल्याचे सध्या व्हायरल एका व्हिडिओत दिसत आहे. डाव्या बाजूचा स्वीचगिअर पण नवीन आहे. यामध्ये नवीन LCD इंस्ट्रूमेंट पॅनल नॅव्हिगेट करण्यासाठी बटण देण्यात आले आहे. इंस्ट्रूमेंटेशन Karizma XMR 210 आणि Xtreme 250R मध्ये दिसले.
सध्याच्या मॉडलची किंमत किती?
इंटरनेटवर दिसणारी मोटारसायकल ही स्वस्त असेल. यामध्ये बेसिक ट्रिपल-ट्री सेटअप, पारंपारिक RSU टेलिस्कोपिक फोर्क्स, कम्यूटर-ओरिएंटेड फुट पेग्स, साडी गार्ड,बंद चेन कव्हर, सिंगल पीस सीट आणि इतर अनेक फीचर असतील. सध्याच्या Hero Glamour ची किंमत 95,098 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही खास बाईक आज अथवा उद्या लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.