ना अदानी ना अंबानी! या व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, या किंमतीत तर येतील दोन आलिशान कार
Expensive Number Plate : अनेक जण महागड्या कार आणि व्हीआयपी नंबर प्लेट खरेदी करतात. भारतात या व्यक्तीने आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट खरेदी केली आहे. त्यासाठी या व्यक्तीने थोडे थोडके नाही तर 47 लाख रुपये मोजले आहेत.

आलिशान कार असावी असे अनेकांचे स्वप्न असते. देशातील मोठे सेलिब्रिटी आणि उद्योजक यांच्या कार नेहमी चर्चेत असतात. काही जण महागड्या कार्स खरेदी करतात. पण सोबतच या कारसाठी VIP नंबर प्लेट पण खरेदी करतात. महेंद्र सिंग धोनी, शाहरूख खान आणि मुकेश अंबानी सारख्या दिग्गजांकडील कारवर खास नंबर प्लेट असतात. त्यासाठी अर्थातच जादा रक्कम मोजावी लागते. पण देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट ही काही एखाद्या अभिनेत्याकडे नाही, वा व्यावसायिकाकडे नाही. तर ही केरळमधील एका व्यक्तीने सर्वात महागडी नंबर प्लेट खरेदी केली आहे.
47 लाखांची VIP नंबर प्लेट
लिटमस7 (Litmus7) कंपनीचे सीईओ वेणू गोपालकृष्णन यांच्या कारच्या ताफ्यात अजून एक आलिशान कार दाखल झाली आहे. त्यांनी जवळपास 4.2 कोटी किंमतीची Mercedes-Benz G63 AMG खरेदी केली आहे. त्यापेक्षा या कारच्या महागड्या नंबर प्लेटची देशभरात चर्चा आहे. त्यांनी परिवहन विभागाकडे या कारची नोंदणी केली आहे. या कारचा रजिस्ट्रेशन क्रमांक KL 07 DG 0007 हा आहे. त्यासाठी वेणू यांनी 47 लाख रुपये मोजले आहे. ही देशातील सर्वात महागडी कार आहे.
Mercedes-Benz G63 AMG
वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या एसयुव्हीसाठी खास सॅटिन मिल्ट्री ग्रीन रंगाची निवड केली आहे. त्यामुळे ही कार एकदम खास आणि दमदार दिसते. यामध्ये ग्लास ब्लॅक अलॉय व्हील्स आणि प्रीमियम लेदर फिनिशिंग इंटिरिअर आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी ड्युअल स्क्रीन सीट एंटरटेनमेंट पॅकेज पण इन्स्टॉल करण्यात आले आहे. या कारमध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन आहे. ते 585 bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क जेनरेट करते. यामध्ये 9-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे.
नंबर प्लेट इतकी खास का?
VIP नंबर प्लेटची भारतात मोठी क्रेझ आहे. पण वेणू यांनी थोडेथोडके नाही तर 47 लाख रुपये मोजले आहेत. ही एखाद्या नंबर प्लेटसाठी मोजलेली सर्वात मोठी रक्कम आहे. पण KL 07 DG 0007 हा नंबर नोंदणीकृत करून वेणू यांनी ती देशातील एक्सक्लूझिव्ह नंबर प्लेट केली आहे.
