अवघ्या 30 दिवसात 2.08 लाख युनिट्सची विक्री, या बाईकमध्ये काय आहे खास?

| Updated on: Feb 21, 2022 | 4:53 PM

भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्‍या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत. यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच 30 दिवसांत एका मोटरसायकलच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

1 / 5
भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्‍या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत. यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच 30 दिवसांत एका मोटरसायकलच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस असे या मोटरसायकलचे नाव आहे.

2 / 5
Hero Splendor Plus ही देशातील तसेच कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक बनली आहे आणि ही बाईक तिची किंमत, मायलेज आणि मजबूत स्टाइलमुळे पसंत केली जाते. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही बाईक 80.6 kmpl इतकं मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

3 / 5
वाहन कंपन्यांच्या जानेवारी महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 मध्ये हिरो स्प्लेंडरला सर्वाधिक पसंती मिळाली आहे आणि या बाइकच्या सर्वाधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

4 / 5
अहवालानुसार, Hero MotoCorp ने जानेवारी 2022 मध्ये या बाईकच्या 2,08,263 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये या बाईकच्या 2,25,382 युनिट्सची विक्री केली होती. जानेवारी 2022 ची विक्री जानेवारी 2021 पेक्षा कमी असतानाही, ती बाईक इतर बाइक्सच्या तुलनेत खूप पुढे आहे.

5 / 5
Hero Splendor मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर 97.2 cc इंजिन दिले आहे, जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या इंजिनच्या मदतीने 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम पीक टॉर्क मिळवता येतो. ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. Hero Splendor ची सुरुवातीची किंमत 65,610 (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर 70,790 रुपयांपर्यंत जाते.