Honda Activa 6G नाही आवडली, तर स्कूटर्समध्ये हे 3 बेस्ट पर्याय, किंमत 75 हजारपेक्षा पण कमी

| Updated on: Apr 27, 2024 | 2:37 PM

Honda Activa 6G Competitors : होंडा एक्टिवा ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर आहे. त्याशिवाय अन्य सुद्धा काही बेस्ट ऑप्शन आहेत. होंडा एक्टिवाच्या स्पर्धेत असलेल्या अन्य स्कूटर्सच्या किंमती सुद्धा 75 हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहेत. या स्कूटर्सच्या डिटेल्स जाणून घ्या.

Honda Activa 6G नाही आवडली, तर स्कूटर्समध्ये हे 3 बेस्ट पर्याय, किंमत 75 हजारपेक्षा पण कमी
Honda Activa 6g Scooter
Follow us on

भारत हे जगातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर मार्केट पैकी एक आहे. इथे तुम्हाला एकापेक्षा एक सरस स्कूटर आणि बाइक मिळतील. स्कूटर बद्दल बोलायच झाल्यास, होंडा एक्टिवा ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. यात कीलेस/अनलॉक, स्मार्ट फाइंड सारखे शानदार फीचर्स मिळतात. एक्टिवाची एक्स-शोरूम प्राइस 76,234 रुपयापासून 82,234 रुपयापर्यंत आहे. याचा थेट सामना हीरो जूम, टीवीएस जुपिटर सारख्या स्कूटर्सशी आहे.

भारतात होंडा एक्टिवा जबरदस्त पॉपुलर आहे. पण, तरीही अनेकांची पसंत वेगळी असते. एक्टिवाच्या बजेटमध्ये अन्य दुसऱ्या स्कूटर्स सुद्धा उपलब्ध आहेत. त्यात शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आहेत. जर, तुम्हाला काही वेगळं हवं असेल, तर तुम्ही एक्टिवाच्या कॉम्पिटिटर स्कूटर्सच्या डिटेल्स जाणून घेऊ शकता. इथे एक्टिवा 6 जी च्या काही स्पर्धक स्कूटर्सची माहिती देण्यात आलीय.

Hero Xoom : हीरो जूम स्कूटर 110.9cc सिंगल सिलेंडर इंजिनच्या पावर सोबत येते. या स्कूटरमध्ये कंपनीने अनेक असे फीचर्स दिले आहेत, जे सेगमेंटमध्ये सर्वात नवीन आहेत. एक्टिवा 6जी एच-स्मार्टच्या तुलनेत जूम कॉर्नरिंग लायटिंग, फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिस्क ब्रेक आणि रुंद टायर सारखे फीचर्स मिळतात. याची एक्स-शोरूम प्राइस 71,484 रुपयापासून 79,967 रुपये आहे.

TVS Jupiter : टीवीएस जुपिटर सुद्धा भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे. यात 109.7cc इंजिन पावर देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये सुद्धा जबरदस्त फीचर्स आहेत. यात नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिविटी, नेविगेशन सारख्या सुविधा आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 73,340 रुपयापासून 89,748 रुपयापर्यंत आहेत.

Hero Destini Prime : हीरो डेस्टिनी प्राइम सुद्धा एक तगडी स्पर्धक आहे. 124.6 cc इंजिनसह ही स्कूटर तुम्हाला शानदार रायडिंगचा अनुभव देते. डेस्टिनी प्राइममध्ये तेलाची बचत करणारी i3S टेक्नोलॉजी, डिजिटल एनालॉग स्पीडोमीटर, LED गाइडलॅप्स, बूट लँप, मोबाइल चार्जिंग पॉइंट सारखे फीचर्स आहे. हीरो डेस्टिनी प्राइमची एक्स-शोरूम प्राइस 71,499 रुपये आहे.

जर तुमचं बजेट थोडं जास्त असेल, तर तुम्ही Hero Pleasure Plus XTEC चा सुद्धा विचार करु शकता. ही स्कूटर 110.9cc एयर कूल्ड 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिनसह येते. यात स्पोर्टी स्ट्रिप्ड थीम, ब्लूटूथ कनेक्टिविटी, प्रोजेक्टर एलईडी हेडलँप, मेटल फेंडर, i3s टेक्नोलॉजी सारखे फीचर्स आहेत. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 78,513 रुपयापासून सुरु होते.