AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होंडा कंपनीची मोठी घोषणा, इलेक्ट्रिक सेगमेंट एका पाठोपाठ एक अशा गाड्या करणार लाँच

होंडा कंपनीने भारतीय बाजारात पाय घट्ट रोवण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंटची तयारी केली आहे. कंपनी 2024 पर्यंत दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

होंडा कंपनीची मोठी घोषणा,  इलेक्ट्रिक सेगमेंट एका पाठोपाठ एक अशा गाड्या करणार लाँच
Honda चा कंपनीचा जबरदस्त प्लान, इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटसाठी आखली अशी व्युहरचनाImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 30, 2023 | 5:28 PM
Share

मुंबई – जापानी वाहन निर्माता कंपनी होंडाने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये घट्ट पाय रोवण्यासाठी व्युहरचना आखली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, होंडा कंपनी पुढच्या पाच वर्षात एकूण 10 इलेक्ट्रिक दुचाकी भारतात सादर करू शकते. तसेच पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 साली होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकही लाँच करण्याच्या तयारी आहे. त्याचबरोबर कंपनी रिमुव्हवेबल बॅटरीसह इलेक्ट्रिक स्कुटर सादर करू शकते. नुकताच होंडा मोटारसायकल कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक सेगमेंटबाबत आपली रणनिती समोर आणली आहे. कंपनी पुढच्या वर्षी दोन इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार आहे.

इलेक्ट्रिक स्कुटर फिक्स्ड आणि स्वॅपेबल अशा दोन्ही पर्यायांसहा येईल. इतकंच नाही तर ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून मिड रेंज सेंगमेंटमध्ये इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. पण कंपनीने पुढच्या लाँच होणाऱ्या टू व्हीलर बाइक असेल की स्कुटर याबाबत खुलासा केलेला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार कंपनी सध्या दहा वेगवेगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीवर भर देत आहे. वेग, रेंज, बॉडी टाइप, स्टाईल आणि अडव्हान्स फीचर्स यावर कंपनी लक्ष केंद्रीत करत आहे.

होंडा कंपनी इलेक्ट्रिक स्कुटर निर्मितीसाठी खास प्लान तयार केला आहे. कंपनीने याला प्लॅटफॉर्म ई असा कोडनेम दिला आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनी वेगवेगळे मॉडेल तयार करणार आहे. तसेच वेगवेगळे बॅटरी पॅक आणि डिझाईनवर आधारित असणार आहेत.

जापानी कंपनीने आतापर्यंत भारतात एकही इलेक्ट्रिक वाहन लाँच केलेलं नाही. त्यामने होंडाने इलेक्ट्रिक वाहन लाँच केल्यास पहिली जापानी कंपनी ठरणार आहे. कंपनी 2024 मध्ये इलेक्ट्रिक अक्टिव्हासह सुरुवात करू शकते.

कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रोडक्ट तयार करण्यासाठी वेगळी ईव्ही फॅक्टरी तयार करू शकते. हा प्लांट कर्नाटकच्या नालासोपाऱ्यात असणार आहे. कंपनीने 2030 पर्यंत या प्लांटमधून 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर्स तयार करण्याचा विडा उचलला आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.