दिवाळीमधील सर्वात मोठी ऑफर्स, या 11 लाख रुपयांच्या कारवर मिळतेय 2.3 लाख रुपयांची सूट, Creta ला देते टक्कर

दिवाळीच्या मुहूर्तावर बंपर ऑफर. या 11 लाख रुपयांच्या SUV कारवर मिळतेय 2.3 लाख रुपयांची सूट. Creta ला टक्कर देते ही कार. खरेदीसाठी होतेय प्रचंड गर्दी.

दिवाळीमधील सर्वात मोठी ऑफर्स, या 11 लाख रुपयांच्या कारवर मिळतेय 2.3 लाख रुपयांची सूट, Creta ला देते टक्कर
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 03, 2026 | 6:01 PM

दिवाळीचा सण जवळ येताच वाहन कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्ही या सणासुदीच्या काळात नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honda Elevate तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकते. या SUV वर ग्राहकांना तब्बल 2.30 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. विशेष म्हणजे, या ऑफरमध्ये 1 लाख रुपयांचे अ‍ॅक्सेसरीज पॅकेजही मोफत दिले जात आहे. मात्र, ही मोठी सवलत जुन्या म्हणजेच प्री-फेसलिफ्ट मॉडेलच्या निवडक स्टॉकवर उपलब्ध आहे. नवीन 2026 फेसलिफ्ट मॉडेलवर तुलनेने कमी फायदे मिळत आहेत.

होंडा एलिव्हेटच्या जुन्या मॉडेलच्या टॉप-स्पेक ZX व्हेरिएंटवर सर्वाधिक 2.30 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यामध्ये 50 हजार रुपयांची थेट रोख सवलत आणि जुन्या कारच्या एक्सचेंजवर 80 हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त बोनस मिळतो.

Loading...

याशिवाय कंपनीकडून 1 लाख रुपयांचे अ‍ॅक्सेसरीज पॅकेज मोफत दिले जात आहे. यामध्ये 360-डिग्री कॅमेरा, डॅशकॅम आणि प्रीमियम सीट कव्हर्स यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या सर्व फायद्यांची एकत्रित किंमत 2.30 लाख रुपयांपर्यंत होते.

V आणि VX व्हेरिएंटवरही आकर्षक ऑफर

Honda Elevate च्या इतर व्हेरिएंटवरही सवलती दिल्या जात आहेत.

V व्हेरिएंटवर 40 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 40 हजार रुपये एक्सचेंज बोनस.

VX व्हेरिएंटवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपये एक्सचेंज बोनस.

ZX व्हेरिएंटवर 50 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 80 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 1 लाख रुपयांचे अ‍ॅक्सेसरीज पॅकेज.

मात्र, एक्सचेंज बोनसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपली जुनी कार एक्सचेंज करावी लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष बचत ग्राहकांच्या पात्रतेवर आणि डीलरशिपच्या अटींवर अवलंबून असेल.

इंजिन आणि मायलेज किती?

नवीन Honda Elevate च्या इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 1.5-लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण करते.

ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, मॅन्युअल व्हेरिएंट 15.31 किमी प्रति लिटर तर CVT व्हेरिएंट 16.61 किमी प्रति लिटर मायलेज देते. या SUV मध्ये सध्या डिझेल किंवा हायब्रीड इंजिनचा पर्याय उपलब्ध नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us