Honda Bike 2023 : बाजारात आली होंडाची नवीन बाइक, स्पेंडरला देणार टक्कर

| Updated on: Apr 01, 2023 | 11:38 AM

कंपनीने ही बाईक ड्रम आणि डिस्क ब्रेक या दोन्ही प्रकारांमध्ये सादर केली आहे, तिच्या ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत 85,131 रुपये आणि डिस्क ब्रेक प्रकारची किंमत 89,131 रुपये इतकी आहे.

Honda Bike 2023 : बाजारात आली होंडाची नवीन बाइक, स्पेंडरला देणार टक्कर
होंडा बाइक
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : होंडा (Honda Motorcycle) ने आज नवीन अद्ययावत इंजिनसह देशांतर्गत बाजारात आपली कम्युटर बाइक SP125 लॉन्च केली आहे. या बाइकला नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म्स अंतर्गत OBD2-अनुरूप इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने ही बाईक ड्रम आणि डिस्क ब्रेक या दोन्ही प्रकारांमध्ये सादर केली आहे, तिच्या ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत 85,131 रुपये आणि डिस्क ब्रेक प्रकारची किंमत 89,131 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक प्रामुख्याने हिरो स्प्लेंडरला बाजारात टक्कर देईल.

नवीन Honda SP125 कंपनीने एकूण पाच रंगांमध्ये सादर केली आहे, ज्यात ब्लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, इम्पीरियल रेड मेटॅलिक, पर्ल सायरन ब्लू आणि न्यूमॅट मार्वल ब्लू मेटॅलिक यांचा समावेश आहे. अद्ययावत इंजिन व्यतिरिक्त, कंपनीने या बाईकमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत, जरी PGM-FI तंत्रज्ञान यात नक्कीच वापरले गेले आहे, त्यामुळे दैनंदीन वापरात बाइकचा मायलेज आणखी चांगला असेल अशी अपेक्षा आहे.

शक्ती आणि कामगिरी

Honda SP125 मध्ये, कंपनीने 125cc क्षमतेचे अपडेटेड BS6 फेज-टू कॉम्प्लायंट इंजिन दिले आहे, जे स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या इंजिनमध्ये प्रोग्रामेबल फ्युएल इंजेक्शन (PGM-FI) प्रणाली देखील वापरली गेली आहे जी 7 ऑनबोर्ड सेन्सर्ससह येते. ही प्रणाली इंजिनला सरासरी इंधन आणि हवेचे मिश्रण प्रदान करते, ज्यामुळे बाइकची इंधन कार्यक्षमता सुधारण्यास देखील मदत होते.

हे सुद्धा वाचा

कंपनीने या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले आहे जे मायलेज, ECO इंडिकेटर, गियर पोझिशनिंग इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि इतर माहिती देते. याशिवाय, या डिस्प्लेमध्ये सरासरी किंवा रिअल टाईम इंधन कार्यक्षमता देखील दर्शविली आहे. बाईकला 5-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन देण्यात आले आहे तर फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन देण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे, जी हाय स्पीड असतानाही संतुलित ब्रेकिंग देते.

लाँच प्रसंगी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अत्सुशी ओगाटा म्हणाले, “OBD2 कंप्लायंट 2023 SP125 लाँच केल्यावर, आम्ही एक अशी मोटरसायकल घेऊन आलो आहोत जी केवळ स्पोर्टीच नाही तर कार्यक्षम आणि पैशासाठीही मूल्यवान आहे. . SP125 आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांची साक्ष आहे. आम्हाला खात्री आहे की ही मोटरसायकल वापरकर्त्यांना उत्तम राइडिंग अनुभव देईल.