Honda CBR 1000 RR-R Price Cut: होंडाची सुपरबाईक 10 लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Honda CBR 1000 RR-R New price : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या एका सुपर मोटरसायकलची किंमत कमी केली आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीमध्ये 5-10 हजार नाही तर तब्बल 10 लाख रुपयांची कपात केली आहे.

Honda CBR 1000 RR-R Price Cut: होंडाची सुपरबाईक 10 लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Honda CBR 1000 RR-R Image Credit source: Hondabigwing.in
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 11:39 AM

मुंबई : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या एका सुपर मोटरसायकलची किंमत कमी केली आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीमध्ये 5-10 हजार नाही तर तब्बल 10 लाख रुपयांची कपात केली आहे. होंडा सीबीआर 1000 आरआर-आर (Honda CBR 1000 RR-R) असं या बाईकचं नाव आहे. आता या फायरब्लेड बाईकची किंमत 23.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी करण्यात आली आहे, या बाईकची जुनी किंमत 32.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी होती. मात्र, होंडाने (Honda) या मोटारसायकलबाबत कोणत्याही बदलांची माहिती दिलेली नाही.

Honda CBr1000RR-R ही एक पॉवरफुल सुपर बाईक आहे, जी ढासू परफॉर्मन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, कंपनीचा दावा आहे की, या बाईकचं हँडलिंग अतिशय स्मूद आहे. या बाइकमध्ये 1000 cc, लिक्विड कूल्ड, इन लाइन 4 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 217 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.

Honda CBr1000RR-R चं डिझाईन

Honda CBR 1000 RR-R मध्ये अतिशय शार्प स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. यात लुकिंग ट्विट हेडलँप देखील मिळतात, जे पूर्ण फ्रंट फायरिंगसह येतात. तसेच यामध्ये बबल स्टाइल फ्रंट व्हिझर्स देण्यात आले आहेत. यात फ्लॅट टॉप फ्यूल टँक आहे. हँडलबार्डवर क्लिप आहेत. यामध्ये एक प्रशस्त सीट आहे जी टेल सेक्शपर्यंत आहे.

Honda CBR 1000 RR-R चं ट्रान्समिशन

ही मोटरसायकल 6 स्पीड सीक्वेशन ट्रान्समिशनसह येते. यामध्ये एका स्लिप एंज असिस्टन्ट क्लचची सुविधा देण्यात आली आहे. या बाईकचं वजन 201 किलोग्रॅम इतकं आहे आणि सुपरबाईकच्या तुलनेत हे वजन जास्त नाही.

Honda CBR 1000 RR-R ब्रेकिंग सिस्टम

या बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर या ड्युअल 330 mm डिस्क ब्रेक आहे आणि मागील बाजूस 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. या Honda बाईकमध्ये 43 mm चा अ‍ॅडजस्टेबल USD फोर्क आहे आणि मागील बाजूस गॅस चार्ज्ड मोनोशॉक देण्यात आला आहे.

Honda CBR 1000 RR-R के व्हील

Honda ने दोन्ही बाजूंना 17 इंचांचे अलॉय व्हील वापरले आहेत. यात पूर्णपणे डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यात ट्विन एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेललाइट्स देखील आहेत. यात स्मार्ट की आणि होंडा इग्निशन सिस्टीम देण्यात आली आहे.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.