होंडाची नवी बाईक उद्या लाँच होणार, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

| Updated on: Feb 15, 2021 | 7:37 PM

होंडाची नवी बाईक उद्या लाँच होणार, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर (Honda's new bike will be launched tomorrow)

होंडाची नवी बाईक उद्या लाँच होणार, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर
होंडा बाईक
Follow us on

मुंबई – होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया उद्या 16 फेब्रुवारी रोजी नवीन बाईक लाँच करणार आहे. कंपनीने या बाईकचे टिझर आधीच जारी केले आहे. बाईकचा लुक मोटरसायकल क्लासिक, स्क्रॅम्बलर किंवा कॅफे रेसर व्हेरिएन्टमध्ये असू शकतो. ही बाईक CB350 प्लेटफॉर्मवर आधारीत आहे. (Honda’s new bike will be launched tomorrow)

काय म्हणाले होंडाचे सीईओ?

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे एमडी आणि सीईओ आत्सुशी ओगाटा यांनी ऑक्टोबरमध्येच सांगितले होते की, H’ness CB 350 बाईकमध्ये अनेक मॉडेल्स उपलब्ध असतील. या बाईकमध्ये बेसिक इंजिन, चैसी आणि सस्पेंशन H’ness CB350 प्रमाणे असेल. बाईकच्या लिक झालेल्या फोटोमध्ये बाईकच्या मागच्या बाजूला ट्विन शॉक अब्जॉर्बर असल्याचे दिसतेय, जे CB350 सारखेच दिसते. तसेच यात डर्ट बाईकप्रमाणे मडगार्ड्स, ड्युअल स्पोर्ट टायर आणि साईड माउंटेड एग्जॉस्ट देखील यात दिसू शकतात.

बाईकची वैशिष्टे

या बाईकमध्ये CB 350 स्क्रॅम्बलर/ कॅफे रेसरमध्ये 348 cc चे सिंगल इंजिन देण्यात आलेय, जे 5500 आरपीएमवर 20.8 बीएचपी पॉवर आणि 3000 आरपीएमवर 30 एनएमचे टॉर्क देईल. बाईकचे स्पीड गिअरबॉक्स आधीप्रमाणेच असेल. होंडा H’ness CB350 एक रेट्रो स्टाईल्स रोडस्टर असून ही बाईक रॉयल एनफील्ड 350 सीसी मोटरसायकलच्या सेगमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. रॉयल एनफिल्डप्रमाणे होंडाही आपले गेम प्लान अधिक बळकट करीत आहे. कंपनी एकाच सेगमेंटमध्ये अनेक प्रकारची मॉडेल्स आणत आहे. तथापि, प्रीमियम मोटारसायकलींसाठी तयार केलेले नवीन मॉडेल्स होंडा बिगविंग डीलरशिप अंतर्गत विकले जातील.

H’ness CB350 मध्ये काय आहे खास?

होंडा H’ness CB350 ने 10,000 युनिट्स विक्रीचा आकडा पार केला आहे. ही बाईक कंपनीने ऑक्टोबर 2020 में लॉन्च केले होते. ही बाईक 350-500cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय आहे आणि रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, जावा क्लासिक आणि Benelli Imperiale 400 सारख्या बाईक्सला कडवी टक्कर देत आहे. होंडा H’ness CB350 होंडा सेलेक्टेबल टॉर्क कंट्रोल फिचरसह येत असून ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमप्रमाणेच आहे. यात तुम्हाला हजार्ड लॅम्प्सचे फिचरही मिळते जे ऑल एलईडी लायटिंग आणि हायली इन्फॉर्मेटिव्ह इंस्ट्रूमेंट कल्सटरसह येते. होंडा H’ness CB350 च्यी DLX व्हेरिएंटची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स शोरूम गुरुग्राम) आणि DLX Pro व्हेरिएंटची किंमत 1.90 लाख रुपये (एक्स शोरूम गुरुग्राम) आहे. (Honda’s new bike will be launched tomorrow)

 

 

संबंधित बातम्या

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन