कोरोना संकटकाळातही प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ

भारतात घरगुती प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 12.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोना संकटकाळातही प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 7:57 PM

मुंबई : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) देशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वाहनांच्या विक्रीबाबतची माहिती सादर केली आहे. SIAM ने म्हटलं आहे की, घरगुती प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 12.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात भारतात 2 लाख 85 हजार 367 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 2 लाख 53 हजार 139 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. (Huge growth in passenger and two-wheeler vehicles sales even during the Corona crisis)

सियामने (Society Of Indian Automobile Manufacturers) दिलेल्या माहितीनुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. सियामने याबाबतची आकडेवारी सादर केली आहे, त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात तब्बल 16 लाख 379 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 14 लाख 10 हजार 939 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. म्हणजेच दुचाकींच्या विक्रीत तब्बल 13.43 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मोटारसायकल्सच्या विक्रीत 14.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात 10 लाख 26 हजार 705 मोटारसायकल्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 8 लाख 73 हजार 726 मोटारसायकल्सची विक्री झाली होती. मोटारसायकलप्रमाणे स्कुटर्सच्या विक्रीतही वाढ झाली आहे. स्कूटर्सच्या विक्रीत यंदा 9.29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 4 लाख 59 हजार 851 स्कुटर्सची विक्री झाली होती, तर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल 5 लाख 2 हजार 561 स्कुटर्सची विक्री झाली आहे.

तीन चाकी वाहनांच्या विक्री घट

देशभरात घरगुती प्रवासी वाहनांच्या आणि दुचाकींच्या विक्रीत वाढ झालेली असताना तीन चाकी वाहनांच्या विक्रीत मात्र मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 55 हजार 778 तीन चाकी वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये यंदा 57.64 टक्क्यांची घट होऊन नोव्हेंबर 2020 मध्ये केवळ 23 हजार 626 तीन चाकी वाहनांची विक्री झाली आहे.

उत्सवांमुळे उत्साह

सियामचे संचालक राजेश मेनन म्हणाले की, उत्सवांच्या वातावरणामुळे ऑटो क्षेत्राला आलेली मरगळ काही प्रमाणात कमी झाली आहे. बाजारात उत्साह परत आला आहे, परंतु ऑटो उद्योगाची पुढील कामगिरी एकूणच लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल.

यामाहाचा धुमाकूळ

यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) नोव्हेंबर 2019 मध्ये 39 हजार 406 वाहनांची विक्री केली होती. ही एकूण विक्री यंदा 35% वाढून यंदा कंपनीने 53 हजार 208 वाहनांची विक्री केली आहे. लॉकडाऊन हटवल्यापासून कंपनीच्या एकूण विक्रीत गेल्या पाच महिन्यांत चांगलीच वाढ झाली आहे.

बजाज ऑटोचीही सरशी

दुचाकी आणि व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) यंदाही चांगला व्यवसाय केला आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के अधिक वाहनांची विक्री केली आहे. बजाज ऑटोने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 4 लाख 3 हजार 223 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ होऊन यंदा बजाजच्या 4 लाख 22 हजार 240 वाहनांची विक्री झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

(Huge growth in passenger and two-wheeler vehicles sales even during the Corona crisis)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.