ह्युंडाईने सुरु केला ‘शील्ड ऑफ ट्रस्ट’ कार्यक्रम, ग्राहक पाच वर्षापर्यंत घेऊ शकतात याचा लाभ

| Updated on: Feb 22, 2021 | 7:31 PM

ह्युंडाईने सुरु केला 'शील्ड ऑफ ट्रस्ट' कार्यक्रम, ग्राहक पाच वर्षापर्यंत घेऊ शकतात याचा लाभ (Hyundai launches 'Shield of Trust' program, customers can take service up to five years)

ह्युंडाईने सुरु केला शील्ड ऑफ ट्रस्ट कार्यक्रम, ग्राहक पाच वर्षापर्यंत घेऊ शकतात याचा लाभ
ह्युंडाईने सुरु केला 'शील्ड ऑफ ट्रस्ट' कार्यक्रम
Follow us on

मुंबई : दक्षिण कोरियाची सर्वात मोठी ऑटो कंपनी आणि भारतातील दुसर्‍या क्रमांकाची वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने सोमवारी ‘शिल्ड ऑफ ट्रस्ट’ कार्यक्रमाची सुरवात केली. हा कार देखभाल कार्यक्रम देशभरातील सर्व ग्राहकांना उपलब्ध असेल. या कार्यक्रमांतर्गत, कंपनी पाच वर्षांसाठी स्वस्त दरात मेंटेनन्स उपलब्ध करेल. ह्युंडाईने या कार्यक्रमांतर्गत नऊ मॉडेल्सचा समावेश केला आहे, ज्यामध्ये ब्रेक आणि क्लच सारख्या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात. कंपनीने म्हटले आहे की या उपक्रमांतर्गत ग्राहक वाहन खरेदीनंतर पहिल्या पाच वर्षांत वायपर, बल्ब, नळी बेल्ट्स यासारख्या 14 भागांची बदली करू शकतील. ही सुविधा नऊ मॉडेल्सवर मिळेल. (Hyundai launches ‘Shield of Trust’ program, customers can take service up to five years)

काय म्हणाले कंपनीचे संचालक?

आम्ही आमच्या ग्राहकांना अखंड आणि त्रास-मुक्त सेवा देण्यासाठी ह्युंडाई शिल्ड कार्यक्रम सुरू केला आहे. ह्युंडाई ही ग्राहककेंद्री संस्था असून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी तत्पर आहे, असे एचएमआयएलचे संचालक (विक्री, विपणन व सेवा) तरुण गर्ग यांनी सांगितले.

कॉन्टॅक्टलेस सर्विसचा लाभ

कंपनीने दावा केला आहे की, ह्युंडाई सर्विसची सुविधा 360 डिग्री डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस सर्विसच्या माध्यमातून अनुभवता येतो. यासोबतच ऑनलाईन सर्विस बुकिंग, व्हेईकल स्टेटस अपडेट, घर किंवा ऑफिसमधून पिक अप किंवा ड्रॉप फॅसिलिटीसह ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटीपर्यंत सर्व सुविधा दिली जाईल. ह्युंडाईचे संपूर्ण भारतात 1298 वर्कशॉप आहेत.

ह्युंडाईचा रौप्यमहोत्सव

दक्षिण कोरियन कंपनी ह्युंडाईने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. कंपनी या निमित्ताने रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. या काळात कंपनीने भारतात 90 लाख कारची निर्मिती केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास मेंटेनन्स प्रोग्राम सुरू केला आहे. शिल्ड ऑफ ट्रस्ट हा कार्यक्रम देशभर राबविला जाईल. (Hyundai launches ‘Shield of Trust’ program, customers can take service up to five years)

 

 

इतर बातम्या

Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 9 जबरदस्त बचत योजना; चांगल्या व्याजासह भरघोस परतावा

सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1145 अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटी बुडाले