
तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. सध्या आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूवर 75,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट सोबतच बरंच काही मिळत आहे. चला तर मग याविषयी पुढे विस्ताराने माहिती जाणून घेऊया.
ह्युंदाई मोटर इंडिया ही सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. ह्युंदाईच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. ह्युंदाई छोट्या कारपासून SUV पर्यंत सर्व काही विकते. अशीच एक SUV व्हेन्यू आहे, जी भारतीय बाजारात मारुती ब्रेझाला टक्कर देते. ह्युंदाई सध्या आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूवर 75,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट सोबतच एक्सचेंज बोनससह इतर सवलतींचा समावेश आहे.
ह्युंदाई व्हेन्यूची एक्स शोरूम किंमत बेस मॉडेल 1.2 पेट्रोलची किंमत 7.94 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 13.62 लाख रुपयांपर्यंत जाते. व्हेन्यू तीन इंजिन पर्यायांसह विकले जाते. यात 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 82 बीएचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 बीएचपी पॉवर आणि 172 एनएम टॉर्क जनरेट करते. 1.2 लीटर इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते, तर टर्बो इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड डीसीटीसह जोडले जाऊ शकते. यात 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 113 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देते.
ह्युंदाई वेन्यूमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रिव्हर्स कॅमेरा आणि हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. यात ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि एबीएससह हिल असिस्ट कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. वेन्यूमध्ये फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, फ्रंट आणि रियर यूएसबी चार्जर आणि स्टोरेजसह ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी सिस्टम सारखे फीचर्स देखील आहेत.
ह्युंदाई व्हेन्यूच्या बाह्य वैशिष्ट्यांमध्ये डार्क क्रोम ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, कॉर्नरिंग लॅम्प्स, कनेक्टिंग एलईडी टेललॅम्प्स, क्रोम डोअर हँडल आणि रूफ रेल यांचा समावेश आहे. यात 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत.
यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) या सहा एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.