जुनी थार घेण्याच्या विचारात आहात? त्या आधी ‘या’ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा होईल पश्‍चाताप

| Updated on: Jul 18, 2022 | 2:19 PM

महिंद्रा थार एएक्स आणि एलएक्स असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे. जर तुम्ही थारचा वापर सुट्यांमध्ये आनंद लुटण्यासाठी करणार असाल तर, त्यासाठी एएक्स व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय राहणार आहे. जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गाडीचा वापर करणार असाल तर, एलएक्स व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.

जुनी थार घेण्याच्या विचारात आहात? त्या आधी ‘या’ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा होईल पश्‍चाताप
Follow us on

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये (Automobile sector) सध्या सेमीकंडक्टर चिपसेटचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सप्लायर चेन मोठ्या प्रमाणात प्रभावीत होत आहे. या सर्व कारणांमुळे विविध कार्सच्या बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपन्या कार्सची वेळेवर डिलिव्हरी करु शकत नाहीत. अनेक गाड्यांना एक वर्षापर्यंतची वाट पहावी लागत आहे. अशात जर तुम्ही नवीन थार (Thar) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, त्यासाठीही तुम्हाला किमान सहा महिने वाट पहावी लागणार आहे. जर तुम्हाला एवढा वेळ थांबायचे नसेल तर अशा ग्राहकांसाठी सेकंड हँड थार (Second Hand Thar) एक चांगला पर्याय ठरु शकतो. तुम्हाला जर जुनी थार खरेदी करायची असेल तर या लेखातील काही महत्वाच्या टीप्स तुमच्या नक्की उपयोगी येउ शकतात…

कोणते व्हेरिएंट खरेदी करावे?

महिंद्रा थार एएक्स आणि एलएक्स असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे. जर तुम्ही थारचा वापर सुट्यांमध्ये आनंद लुटण्यासाठी करणार असाल तर, त्यासाठी एएक्स व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय राहणार आहे. जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गाडीचा वापर करणार असाल तर, एलएक्स व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. महिंद्रा थार सेकेंड जेन मॉडेल दोन वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. ही कार 2 वर्ष/1,00,000 किलोमीटर वॉरंटीसह उपलब्ध आहे. जुन्या कार खरेदी केल्यावर अशा ग्राहकांना वॉरंटीचा फायदाही मिळू शकतो. जर गाडीच्या जुन्या मालकाने एक्सटेंडेड वारंटी पॅकेज घेतले असेल तर ही चांगली डील ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण बॉडी तपासून घ्या

महिंद्रा थारचा वापर करणारे जास्त ग्राहक हे ऑफ रोड राइडिंगचा आनंद घेत असतात. खरबड्या रस्त्यांवरुन चालल्यामुळे गाडीच्या बॉडीचे नुकसान होण्याचा धोका असतो. अशात जुनी थार खरेदी करताना गाडीच्या खालील भाग नीट तपासून घेणे आवश्‍यक आहे.

छताचे लिकेज अन्‌ अँड्राईड ऑटो

महिंद्रा थारच्या काही युजर्ससाठी छताचे लिकेज ही एक सामान्य समस्या आहे. सध्या पावसाळी दिवस सुरु आहेत. त्यामुळे अशा दिवशांमध्ये गाडीचे छत बारकाईने तपासून घ्यावे, छतातून पाणी लिक झाल्यामुळे कारच्या इंटीरियरवरही त्याचा परिणाम होउ शकतो. काही थारमध्ये अँड्राईन ऑटोचीही समस्या सामान्य आहे. अशा वेळी ग्राहकांनी आपले डिव्हाईस कनेक्ट करुन सिस्टीम चेक करुन बघावी.