अमेरिकेत ‘Indian Motorcycle’चा बोलबाला! या ब्रँडचा भारताशी काय संबंध? जाणून घ्या सर्वकाही
भारताने ऑटोक्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रगती केली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांचा डंका संपूर्ण जगभर वाजत आहे. असं असताना भारतात जवळपास दहा वर्षे बाइक विकणाऱ्या इंडियन मोटरसायकल कंपनीने एक बाइक लाँच केली आहे. विशेष म्हणजे नावसाध्यर्म असलेला हा भारतीय ब्रँड नाही. कसं काय ते समजून घ्या

इंडियन मोटरसायकल कंपनीच्या नव्या बाइकची चर्चा जोरात आहे. या कंपनीने भारतात स्काउट सीरिज लाँच केली आहे. ही एक बॉबर स्टाइल असलेली मिडलवेड क्रुझर बाइक आहे. ही नवी कोरी बाइक भारतातल्या हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फसारख्या ब्रँडशी स्पर्धा करेल. पण इंडियन मोटारसायकल ब्रँड हा भारतीय आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पण त्याचं भारताशी खास असं नातं आहे. हा एक अमेरिकन ब्रँड आहे. पण नावसाधर्म्य असल्याने भारतीय ब्रँड असल्याचं वाटतं. इंडियन मोटरसायकल ही अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी प्रिमियम क्रुझर मोटरसायकल बनवते. नुकतंच या कंपनीने भारतात बाइक लाँच केली आहे. ही सर्वात परवडणारी बाईकपैकी एक आहे. तर मग या कंपनीचं भारताशी असलेलं नात कसं? 2011 मध्ये पोलिरिस इंडस्ट्रीजने हा ब्रँड खरेदी केला आणि त्याला पुन्हा एकदा नवा साज दिला. नव्या पिढीला अनुसरून उत्पादन सुरु केलं.
इंडियन मोटोसायकल कंपनीची स्थापना 1897 साली झाली होती. माजी सायकल रेसर जॉर्ज एम हेंडी यांनी सायकल बनवण्यासाठी ही कंपनी स्थापन केली होती. 1900 मध्ये या कंपनी माजी सायकल रेसर ऑस्कर हेडस्ट्रॉम सहभीगी झाले. त्यांनी मिळून 1.75 बीएचपी सिंगल सिलेंडर इंजिन असलेली मोटरसायकल तयार केली. या अमेरिकन उत्पादकाने 1901 ते 1953 या कालावधीत मॅसॅच्युसेट्समध्ये मोटारसायकलींचे उत्पादन केले. पण मागणीत घट झाली आणि उत्पादन थांबले. 2011 मध्ये पोलारिसने ही कंपनी विकत घेतली आणि उत्पादन सुरु केले. नव्या ढंगात उत्पादन सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच या कंपनीच्या गाड्यांनी अमेरिकेत नावलौकीक मिळवला. हा अमेरिकेतली प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ब्रँड ठरला आहे.
इंडियन मोटरसायकल या नावाचा भारताशी तसा काही संबंध नाही. हे नाव जॉर्ज एम हेंडी यांच्या सायकल ब्रँड अमेरिकन इंडियनवरून घेतलं आहे. या ब्रँडचं नाव आणि त्याचा लोगोत अमेरिकेतील मूळ निवासी असलेल्या रेड इंडियनला दाखवलं गेलं आहे. अमेरिकेच्या मूळ निवासी असलेल्या सन्मान म्हणून हा लोगो तयार केला आहे. 2014 पासून पोलारिस इंडियाने भारतात हा ब्रँड सुरु केला. तेव्हापासून येथे त्याची विक्री सुरु आहे.
