AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँचिंगनंतर काहीच दिवसात Kia Carens च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती आणि विक्रीचे आकडे

इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे बाजारात अनेक गाड्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसत आहे. एप्रिल महिन्यापासून अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. किआ ही त्यापैकी एक कंपनी आहे.

लाँचिंगनंतर काहीच दिवसात Kia Carens च्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती आणि विक्रीचे आकडे
Kia CarensImage Credit source: Kia
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 05, 2022 | 10:59 AM
Share

मुंबई : इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे बाजारात अनेक गाड्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसत आहे. एप्रिल महिन्यापासून अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. किआ ही त्यापैकी एक कंपनी आहे. किया इंडियाने (Kia India) अलीकडेच थ्री रो ऑफरिंग केरेन्सची (Kia Carens) किंमत वाढवली आहे. कार निर्मात्या कंपनीने अधिकृतपणे कोणतीही भाडेवाढ जाहीर केली नसली तरी, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आता केरेन्सच्या अपडेटेड किंमती पाहायला मिळत आहेत. Kia Carens ही कंपनीची एक प्रीमियम SUV कार आहे ज्यामध्ये थ्री रो सीटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते. ही कार काही आठवड्यांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. या कारची किंमत (Kia Carens Price Hike) 20,000 ते 70,000 रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढवण्यात आली आहे.

या कारच्या बेस व्हेरिएंटच्या (या व्हेरिएंटला प्रीमियम मॉडेल म्हटलं जातं) किंमतीत आता 60,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 9.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. 16.19 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आलेल्या Luxury Plus 7 व्हेरिएंटसाठी ग्राहकांना आता 16.59 लाख (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. या मॉडेलची अपडेटेड किंमत 40,000 रुपयांने वाढली आहे.

किआ कारची लेटेस्ट दरवाढ

1.4 लीटर पेट्रोल 7-स्पीड DCT लक्झरी प्लस 6 सीटरसह सुसज्ज असलेल्या कारच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत आता 17.44 लाखांपासून सुरू होईल, तर त्याच-स्पेक व्हेरिएंटच्या सात-सीटर व्हर्जनची किंमत 17.49 लाख रुपये इतकी असेल. टॉप-स्पेक पेट्रोल व्हेरिएंट सुरुवातीला 16.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलं होतं. टॉप-स्पेक 1.5 लीटर डिझेल व्हेरियंट, जे त्याच किमतीत लॉन्च केलं होतं, याच्या सहा-सीटर व्हेरिएंटसाठी आता ग्राहकांना 65,000 रुपये अधिक आणि सात-सीटर व्हेरिएंटसाठी 70,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील.

केरेन्सा मोठी मागणी

Kia ने अलीकडेच घोषणा केली आहे की या वर्षी 14 जानेवारी रोजी बुकिंग्स सुरु झाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या कारने 50,000 युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरियंट हे 45% बुकिंग योगदानासह लोकप्रिय पर्याय आहेत. दरम्यान, कंपनीने मार्चमध्ये 7,000 युनिट्सची विक्री केली आहे.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!