Mahindra XUV400 उद्या होणार लाँच… काय असणार खास?

XUV400 ही महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही कार असेल. कंपनी उद्या भारतीय बाजारात कार सादर करणार आहे. Tata Nexon EV चे देशातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एकतर्फी वर्चस्व आहे. त्यामुळे आता महिंद्राची XUV400 लाँच केल्यानंतर Tata Nexon EV ला कशी टक्कर देईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Mahindra XUV400 उद्या होणार लाँच... काय असणार खास?
Mahendra XUV 400Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 5:57 PM

भारतीय एसयुव्ही मार्केटमध्ये आतापर्यंत महिंद्राचे (Mahindra) वर्चस्व राहिले आहे. टाटाच्या (Tata) इलेक्ट्रिक सेगमेंटला टक्कर देण्यासाठी आता महिंद्रानेही कंबर कसली आहे. महिंद्रा 8 सप्टेंबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही XUV400 सादर करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक एसयुव्ही (Electric SUV) महिंद्रा XUV300 कॉम्पॅक्ट एसयुव्हीवर आधारित आहे. भारतात दाखल झाल्यानंतर, महिंद्रा XUV400 ची देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक एसयुव्ही Tata Nexon EV शी स्पर्धा होईल. महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही XUV300 ही कॉम्पॅक्ट एसयुव्हीवर आधारित आहे, पण ही कार XUV300 पेक्षा मोठी असेल. रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा XUV400 पूर्ण चार्ज केल्यावर 400-450 किमी धावेल अशी अपेक्षा आहे.

XUV400 चे संभाव्य फीचर्स

अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही महिंद्रा XUV400 ला नवीन आणि अपडेटेड फ्रंट फेस मिळेल. त्याचबरोबर ही एसयुव्ही XUV300 पेक्षा मोठी असेल. त्याचा मागील भागही नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. आगामी कारला ट्विन पीक लोगो आणि विशेष ब्लू पेंट शेड मिळेल. नवीन फ्रंट ग्रिल, बंपरवरील कॉपर रंगाचे एलिमेंटस्‌ आणि नवीन L-आकाराचे LED DRL ही महिंद्र XUV400 चे काही खास फीचर्स ठरणार आहेत.

इंटीरियर

महिंद्रा XUV400 चे इंटिरियर देखील अप्रतिम असेल. यात अपडेटेड डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन रंग मिळणार आहेत. याशिवाय टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक यासारख्या फीचर्सचाही समावेश आहे. महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये मोठा सनरूफ, ऑटो डिमिंग IRVM आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स देखील मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा

रेंज आणि ADAS

आगामी इलेक्ट्रिक एसयुव्ही दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येऊ शकते. यामध्ये हाय पॉवर व्हेरियंटने एका चार्जवर 400-450 किमी अंतर कापण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी कमी पॉवर व्हेरिएंटने एका पूर्ण चार्जवर 300 किमी अंतर कापणे अपेक्षित आहे. ही कार अत्याधुनिक सेफ्टी फीचर्सने सज्ज असेल. त्याच वेळी ADAS असलेली देशातील पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल.

Non Stop LIVE Update
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.