मार्क लिस्टोसेला टाटा मोटर्सचे नवे सीईओ, भारतबेंझच्या यशात महत्वाचे योगदान

मार्क लिस्टोसेला टाटा मोटर्सचे नवे सीईओ, भारतबेंझच्या यशात महत्वाचे योगदान (Marc Llistosella is the new CEO of Tata Motors)

मार्क लिस्टोसेला टाटा मोटर्सचे नवे सीईओ, भारतबेंझच्या यशात महत्वाचे योगदान
मार्क लिस्टोसेला टाटा मोटर्सचे नवे सीईओ
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 2:13 PM

मुंबई : उद्योग क्षेत्रात देशातील अग्रगण्य कंपनी टाटा मोटर्सच्या सीईओ पदी आता मार्क लिस्टोसेला यांची नियुक्ती झाली आहे. टाटा मोटर्सने शुक्रवारी मार्क लिस्टोसेला यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती केल्याचे जाहिर केले. टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतमध्ये म्हटले आहे की, 1 जुलै 2021 पासून लिस्टोसेला कंपनीचा कार्यभार सांभाळतील. विद्यमान सीईओ गुएंटेर बुश्चेक यांनी कंपनीसोबत झालेल्या करारामध्ये वैयक्तिक कारणांमुळे जर्मनीमध्ये स्थलांतरीत होण्याची इच्छा शेवटी व्यक्त केली होती. आपण 30 जून 2021 पर्यंत टाटा मोटर्सच्या सीईओ आणि एमडी पदावर कार्यरत राहू असे बुश्चेक यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे बुश्चेक यांच्या जागी मार्क लिस्टोसेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Marc Llistosella is the new CEO of Tata Motors)

काय म्हणाले टाटा मोटर्सचे चेअरमन?

टाटा मोटर्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी सांगितले की, मार्क लिस्टोसेला यांचे टाटा मोटर्समध्ये स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. लिस्टोसेला एक ऑटोमोटिव्ह बिझनेस लीडर आहेत. कमर्शिअल वाहनांमध्ये मार्क यांना सखोल ज्ञान असून, हे त्यांचे वैशिष्ट आहे.

काय म्हणाले मार्क लिस्टोसेला?

एवढी वर्षे भारतात राहिल्यानंतर आता एक रोमांचक अध्याय सुरु झाल्याची भावना मार्क लिस्टोसेला यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली. आम्ही संयुक्तपणे टाटा मोटर्सची औद्योगिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करु, असा निर्धारही लिस्टोसेला यांनी व्यक्त केला आहे.

कोण आहेत मार्क लिस्टोसेला?

लिस्टोसेला सध्या स्वीडिश ट्रान्सपोर्ट कंपनी ईनराईड(Einride)च्या बोर्ड कमिटीमध्ये आहेत. याआधी त्यांनी डेमलर ट्रक्स कंपनीसोबत दीर्घकाळ काम केले. त्यानंतर 2015-2018 दरम्यान मित्सुबिशी फुसो ट्रक अँड बस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ होते, येथे त्यांनी व्यवसायातील नफा आणि विक्री क्षमता सुधारण्यावर भर दिला. वर्ष 2008-2014 मध्ये लिस्टोसेला डेमलर कमर्शियल व्हेईकल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून भारताबाहेर काम पाहिले. तेथे त्यांनी ट्रकचा विकास, उत्पादन आणि विक्रीकरीता एक ग्रीनफिल्ड संघटना आणि बिझनेस युनिटची निर्मिती केली. त्यानंतर वर्ष 2012 मध्ये लिस्टोसेला यांनी डेमलर कमर्शियल व्हेईकल इंडियाचे भारतबेंझ(BharatBenz) हे ब्रांड लाँच केले आणि यशस्वीही केले.

प्रवासी वाहनांवर लक्ष केंद्रीत

टाटा मोटर्सचा 2016-17 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एकूण स्वतंत्र महसूल 49,100 कोटी रुपये होता. टाटा मोटर्सने 2017 मध्ये व्यावसायिक वाहनांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आपल्या देशांतर्गत व्यवसायाची योजना जाहीर केली. त्यानंतर, 2017-18 मध्ये, कंपनीने आपल्या विक्रीमध्ये लक्षणीय सुधारणा केली. टाटा मोटर्सने २.० च्या टर्नअराऊंडमध्ये प्रवासी वाहनांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या, कंपनी खासगी वाहन युनिटला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविण्यासाठी भागीदार शोधत आहे. (Marc Llistosella is the new CEO of Tata Motors)

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

टेस्लाकडून मॉडेल वाय लाँच; जाणून घ्या, ‘या’ इलेक्ट्रिक वाहनाची किंमत अन् फीचर्स

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.