AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MARKET TIPS: बुलेट कंपनीचा हायस्पीड 250000% रिटर्न; 1 लाखांची गुंतवणूक, 27 कोटींचे रिटर्न

गुंतवणूक करणाऱ्याना दीर्घकालीन गुंतवणुकदारांना तब्बल 2,50,000 टक्के परताना मिळवून दिला आहे. आयशर मोटर्सचा शेअर 16 ऑक्टोबर 1998 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाला.

MARKET TIPS: बुलेट कंपनीचा हायस्पीड 250000% रिटर्न; 1 लाखांची गुंतवणूक, 27 कोटींचे रिटर्न
रॉयल एनफिल्डImage Credit source: tv9
| Updated on: Jun 10, 2022 | 7:50 PM
Share

नवी दिल्ली- शेअर बाजारात गुंतवणूक (SHARE MARKET INVESTMENT) करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या जातात. अर्थजाणकार नेहमी छोट्या कालावधीत मोठा नफा मिळवून देणाऱ्या शेअर्सच्या प्रलोभनात न अडकण्याचा सल्ला देतात. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे (LONG TERM INVESTMENT) जाणकार गुंतवणुकदारांचा नेहमी कल दिसून आला आहे. बुलेट आणि रॉयल एनफिल्डची (ROYAL ENFILED) निर्मिती करणाऱ्या आयशर मोटर्सच्या शेअर्सने निरीक्षण खरं ठरवलं आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्याना दीर्घकालीन गुंतवणुकदारांना तब्बल 2,50,000 टक्के परताना मिळवून दिला आहे. आयशर मोटर्सचा शेअर 16 ऑक्टोबर 1998 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाला. यावेळी आयशर मोटर्सच्या शेअर्सची किंमत एक रुपये इतकी होती. सध्या शेअर्सची प्रति किंमत 2700 रुपयांवर पोहोचली आहे. आज (शुक्रवारी) व्यवहारादरम्यान शेअर्स बळकटीसह 2,730 रुपयांवर ट्रेडिंग सुरू आहे.

बंपर रिटर्न:

आयशर मोटर्सच्या शेअर्सने गेल्या काही वर्षात शेअर्सने गुंतवणुकदारांच्या गंगाजळीत तब्बल 2,50,000 टक्क्यांच्या परताव्याची भर पडली आहे. एक रुपयांच्या लेव्हलवर कोणताही गुंतवणुकदार या स्टॉक्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणुक करत असल्यास त्याचे गुंतवणूक मू्ल्य 27 कोटीहून अधिक होते.

गेल्या 10 वर्षाची तुलना करता आयशर मोटर्सचा शेअर मल्टीबॅगर ठरला होता. कंपनीचा स्टॉक 22 जून 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्जेंज वर अंदाजित 200 रुपये होता. सध्याच्या मूल्याची तुलना केल्यास गेल्या 10 वर्षात 1265 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दोलायमान कामगिरी:

आयशर मोटर्स शेअर्ससाठी चालू वर्ष समाधानकारक कामगिरीचं ठरलं नव्हतं. सप्टेंबर 2017 मध्ये आयशर मोटर्सचा स्टॉक उच्चांकावर होता. त्यावेळी शेअर्सने 3260 रुपयांचा टप्पा पार केला होता. मल्टिबॅगर शेअर्सचा भाव 52 आठवड्यात 2994 रुपयांच्या स्तरावर होता. गेल्या पाच वर्षात शेअर्सच्या भावात पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

बुलेट राजा:

आयशर मोटर्स हा भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी मानली जाते. आयसर समूहाची बुलेट व्यतिरिक्त ट्रक, मोटारसायकल यामध्ये देखील निर्मिती आहे. तरुणांव्यतिरिक्त सर्व वयोगटात भारतात बुलेटचं आकर्षण वाढलं आहे. त्यामुळे महानगरापासून ग्रामीण भागापर्यंत बुलेट रस्त्यावर धावताना दिसून येतात. रॉयल एनफिल्डच्या बुलेटला सर्वाधिक पसंती आहे.

(अस्वीकरण: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. तुम्हाला शेअर बाजार संबंधित अद्ययावत माहिती प्रदान करणं आमचं उद्दिष्ट आहे.)

पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.