AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki : मारुतीचा मास्टरस्ट्रोक, मोठ्या कुटुंबाचा विचार करुन SUV, EV सेगमेंटमध्ये लॉन्च होणार 2 नव्या गाड्या

Maruti Suzuki : मारुती सुजुकी ही भारतातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय करा उत्पादक कंपनी आहे. लवकरच मारुती दोन मोठ्या फॅमिली कारस लॉन्च करणार आहे. मारुतीच्या येणाऱ्या दोन गाड्या खासकरुन मोठ्या कुटुंबांना लक्षात ठेऊन बनवल्या जात आहेत.

Maruti Suzuki : मारुतीचा मास्टरस्ट्रोक, मोठ्या कुटुंबाचा विचार करुन SUV, EV सेगमेंटमध्ये लॉन्च होणार 2 नव्या गाड्या
Maruti Suzuki
| Updated on: Jun 15, 2026 | 3:24 PM
Share

मारुती सुजुकी ही भारताची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. पुढच्या काही वर्षात ही कंपनी आपल्या ताफ्यात अनेक नव्या कार्सचा समावेश करणार आहे. कंपनीच्या विजन 3.0 रणनितीनुसार, पुढच्या पाच वर्षात मारुती सुजुकी 28 मॉडल बाजारात आणणार आहे. भारतीय बाजारपेठेत आपली हिस्सेदारी पुन्हा 50 टक्क्यापर्यंत नेणं हा त्यामागे उद्देश आहे. मारुती सुजुकीचा फोकस आता फक्त पेट्रोल कार पुरता मर्यादीत नाही. कंपनी SUV, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनं बाजारपेठेत आणणार आहे. याच साखळीमध्ये मारुती लवकरच दोन फॅमिली करा लॉन्च करणार आहे. यात एक 7 सीटर SUV आणि दुसरी 3 रो इलेक्ट्रिक MPV असणार आहे.

ICN च्या रिपोर्ट्नुसार मारुतीच्या येणाऱ्या दोन गाड्या खासकरुन मोठ्या कुटुंबांना लक्षात ठेऊन बनवल्या जात आहेत. ग्राहकांना जास्त स्पेस, चांगला मायलेज आणि इको फ्रेंडली पर्याय उपलब्ध करुन देणं हा मारुतीचा उद्देश आहे. नव्या 7 सीटर SUV ला सध्या Y17 कोडनेम नाव देण्यात आलं आहे. ही SUV Maruti Suzuki Grand Vitara वर आधारित असेल. तोच प्लॅटफॉर्म, इंजिन, फिचर्स आणि नव्या डिझाइनच्या एलिमेंट्सचा वापर केला जाईल.

विक्री कधी सुरु होणार?

दुसरीकडे YMC कोडनेम असणारी नवी इलेक्ट्रिक MPV संपूर्णपणे इलेक्ट्रिकवर असेल. या कारला 27P स्केटबोर्ड प्लेटफॉर्मवर तयार केलं जाईल. 27P स्केटबोर्डवर Maruti Suzuki eVitara तयार करण्यात आली. 7 सीटर ग्रँड विटारा 2026 अखेरीस लॉन्च होईल. 2027 पासून विक्री सुरु होईल.

संपूर्ण कुटुंब आरामात प्रवास करु शकेल

7 सीटर ग्रँड विटारा विद्यमान 5 सीटर मॉडल पेक्षा लांब असेल. लांब व्हीलबेस आणि मोठ्या केबिनमुळे आता जास्त स्पेस मिळेल. सर्वात मागे तिसरी सीट जोडली जाईल. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आरामात प्रवास करु शकेल. डिजाइन आणि फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास याचा लूक बऱ्याच प्रमाणात विद्यमान ग्रँड विटाराशी मिळता-जुळता असेल. यात मोठी टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, सनरूफ, मल्टीपल एयरबॅग आणि एडवान्स सेफ्टी फीचर्स मिळतील अशी अपेक्षा आहे. इंजिनमध्य 1.5 लीटर K15C पेट्रोल माइल्ड-हायब्रिड इंजिन आणि 1.5 लीटर स्ट्रॉन्ग-हायब्रिड इंजिन मिळेल अशी अपेक्षा आहे. हे इंजिन चांगलं मायलेज आणि कमी इंधन खर्चासाठी ओळखले जातात.

मारुतीच्या नव्या इलेक्ट्रिक MPV चं डिजाइन बऱ्याच प्रमाणात eVitara सारखं असू शकतं. फ्रंट बंपर, फ्लश डोर हँडल आणि अलॉय व्हील्सच्या डिजाइनमध्ये बदल होऊ शकतो. याची बॉडी डिजाइन eVitara च्या तुलनेत थोडं जास्त स्मूद आणि फॅमिली-फ्रेंडली होऊ शकतं. मागे लागणाऱ्या वर्टिकल टेललाइट्सचं डिजाइन बऱ्याच प्रमाणात Maruti Suzuki Ertiga सारखं असेल.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन