Auto 2023 : 5.54 लाख रुपये किमतीच्या कारची देशभरात हवा, टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटा या गाड्यांना टाकलं मागे

ऑटो कंपन्यांच्या विक्रीचे आकडे दर महिन्याला येतात. या आकडेवारीवरून कोणत्या गाडीला ग्राहकांनी पसंती दिली आहे कळतं. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत टाटा आणि ह्युंदाई कंपनीच्या गाड्या मागे पडल्याचं चित्र आहे.

Auto 2023 : 5.54 लाख रुपये किमतीच्या कारची देशभरात हवा, टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटा या गाड्यांना टाकलं मागे
Auto 2023 : महिनाभरात या गाडीची मागणी वाढली, टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटासारख्या गाड्या फेल
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 1:44 AM

मुंबई : एप्रिल 2023 या महिन्यात ऑटो कंपन्याच्या विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. पण काही गाड्यांच्या विक्रीवर जराही फरक पडलेला दिसत नाही. मागच्या महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या दहा पैकी सहा गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. यात सर्वाधिक विक्री झालेली गाडी वॅगनआर आहे. या गाडीच्या 20 हजाराहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर मारुती सुझुकी स्विफ्ट आणि बलेनोचा नंबर येतो. पण कंपनीची एक गाडी मागच्या महिन्यात 14 व्या स्थानावर होती ती आता टॉप 10 मध्ये आली आहे.

एप्रिल 2023 महिन्यात मारुति वॅगनआरची विक्री नंबर एक

मागच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये मारुती सुझुकी वॅगनआर 20,879 लोकांनी विकत घेतली आहे. तर हीच विक्री एप्रिल 2022 मध्ये 17,766 इतकी होती. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मारुती वॅगनआरची एक्स शोरुम किंमत 5.54 लाख रुपये आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7.42 लाख रुपये आहे. वॅगनआरचा मायलेज 54.19 किमी प्रति लिटर ते 34.05 किमी प्रति किलोपर्यंत आहे.

दुसऱ्या नंबरवर मारुति सुझुकी स्विफ्ट

मागच्या महिन्यात मारुती सुझुकीची स्विफ्ट गाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. ही गाडी 18,573 लोकांनी घेतली आहे. मागच्या वर्षी या महिन्याच्या तुलनेत 100 टक्के वाढ झाली आहे. तर मारुती बलेनो तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. ही गाडी 16,180 लोकांनी विकत घेतली आहे.

चौथ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन

सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारच्या यादीत टाटा नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर आहे. टाटा नेक्सॉन मागच्या महिन्यात 15,002 लोकांनी विकत घेतली. पाचव्या क्रमांकावर ह्युंदाई क्रेटा आहे. 14,186 युनिट्सची विक्री झाली.

सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकी ब्रेझा (11,836), सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो (11,548), आठव्या क्रमांकावर टाटा पंच (10,934), नवव्या क्रमांकावर मारुती सुझुकी इको (10,504), दहाव्या क्रमांकावर (10,342) या गाड्या आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.