Maruti चा मोठा प्लान, नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Maruti Suzuki अपनी लोकप्रिय SUV Brezza, Fronx और Grand Vitara को बड़े अपडेट के साथ लॉन्च करने की तैयारी कर रही है. 2026 में Brezza और Grand Vitara फेसलिफ्ट मॉडल बाजार में आ सकते हैं, जबकि नई Fronx 2027 में लॉन्च होने की संभावना है.

मारुतीची सुझुकी कंपनी येणाऱ्या काही वर्षात भारतीय SUV बाजारात आपली स्थिती आणखी मजबूत करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे लक्ष्य साल २०३० पर्यंत आपल्या पोर्टफोलिओला १८ मॉडेल पासून वाढवून २८ मॉडेलपर्यंत करायचे आहे.यासाठी कंपनीने SUV सेगमेंटवर खास लक्ष दिले आहे. याच योजनेंतर्गत मारुतीने आपल्या तीन खास सर्वात लोकप्रिय SUV Brezza, Fronx आणि Grand Vitara ना मोठ्या अपडेट सह सादर करण्याची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नव्या Maruti Brezza आणि Grand Vitara फेसलिफ्टना २०२६ च्या दिवाळी सिझनच्या आसपास लाँच केले जाऊ शकते. तसेच अपडेटेड Maruti Fronx ची एंट्री २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे.
नव्या Maruti Brezza कारमध्ये काय खास?
2026 Maruti Brezza फेसलिफ्ट मॉडेलच्या डिझाईनमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहे. SUV मध्ये नवा बंपर, अपडेटेड फ्रंट ग्रिल, नवीन डिझाईनच्या अलॉय व्हील आणि बदलेले फॉग लँप सेटअप दिला जाऊ शकतो. केबिनमध्ये अनेक नवीन फिचर्स जोडण्याची शक्यता आहे.
नवीन Brezza मध्ये मोठी 10.1 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस एंड्रॉयड ऑटो आणि एप्पल कारप्ले कनेक्टिव्हीटी, नवीन सीट फॅब्रिक आणि चांगले इंटेरिअर फिनिशिंग मिळू शकते.
इंजिनाचा विचार करता कंपनी Fronx मध्ये मिळणारे 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन Brezza मध्ये देखील मिळू शकते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येऊ शकते. तसेच सीएनजी व्हर्जनमध्ये अंडरबॉडी CNG टँकचा देखील पर्याय देखील पाहायला मिळू शकतो. ज्यामुळे बुट स्पेस चांगला होऊ शकतो.
Grand Vitara ला मिळणार नवा लुक
Maruti Grand Vitara फेसलिफ्टमध्ये डिझाईनमध्ये मोठे बदल नसले तरी या कारला आधीच्या तुलनेत अधिक प्रीमियम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. SUV मध्ये नवीन ग्रिल, बदलेले फ्रंट आणि रिअर बंपर, नवीन अलॉय व्हील आणि अपडेटेड LED लायटिंग मिळू शकते.
फिचर्सचा विचार करता यात मोठा टचस्क्रीन, संपूर्णपणे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि लेव्हल- 2 ADAS सारखे एडव्हान्स सेफ्टी फिचर्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याच्या इंजिन आणि मॅकेनिकल सेटअपमध्ये कोणताही मोठा बदल असण्याची शक्यता नाही.
Fronx बनणार हायब्रिड SUV
Maruti Fronx च्या पुढील अपडेटमध्ये सर्वात मोठी खासियत म्हणजे हीचा हायब्रिड पॉवरट्रेन असू शकतो. म्हटले जात आहे ही Maruti Suzukiची अशी पहिली कार असेल जिला कंपनीने स्वत: विकसित केलेले स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम मिळेल.
ही हायब्रिड सिस्टीम 1.2 लिटर पेट्रोल इंजिनवर आधारित होऊ शकतो. ज्यामुळे चांगला मायलेज आणि कमी इंधनाचा खर्च असा फायदा मिळेल. नंतर हेच हायब्रिड तंत्रज्ञान नव्या Baleno, Swift आणि Brezza मध्ये देखील पहायला मिळू शकते.
नव्या Fronx मध्ये लेव्हल-2 ADAS, व्हेंटिलेटेड सिट्स आणि मोठी टच स्क्रीन सारखे फिचर्स देखील पाहायला मिळू शकतात. याच्या एक्सटिरिअरमध्ये हलका बदल केला जाऊ शकेल, म्हणजे सुव्ह आधी पेक्षा जास्त फ्रेश आणि आधुनिक दिसेल.
एकूण काय तर मारुती सुझुकी येत्या दोन वर्षात तिच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या सुव्हना नवीन फिचर्स, चांगले तंत्रज्ञान आणि हायब्रिड पर्यायांसह बाजारात उतरवण्याची तयारी करीत आहे. यामुळे कंपनीला सुव्ह सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यास मदत मिळू शकते.