
मारुती सुझुकी कंपनीने पुढच्या वर्षासाठी अनेक नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची योजना आखली आहे. यात e Vitara इलेक्ट्रिक SUV चा देखील समावेश आहे. आगामी काळात दाखल होणाऱ्या कारमध्ये flex-fuel ने धावणारी Fronx कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर, Brezza फेसलिफ्ट आणि एक इलेक्ट्रिक फैमिली कार ( कोडनेम- Maruti YMC ) यांचा देखील समावेश होणार आहे. YMC भारतात कंपनीची दुसरी इलेक्ट्रीक कार असेल आणि ती Kia Carens Clavis EV ला टक्कर देणार आहे. कंपनीच्या प्रोडक्ट लाईन – अपमध्ये नवीन मारुती इलेक्ट्रीक MPV ला Ertiga आणि XL6 च्या वर राखले जाईल.
नवीन Maruti इलेक्ट्रीक MPV ची अधिकृत लाँच तारीख अजूनही घोषीत झालेली नाही. परंतू हीला साल 2026 च्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते. हीचे प्रोडक्शन सप्टेंबर 2026 पासून सुरु होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्स नुसार ही MPV 27PL स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मच्या एक व्हेरिएंटवर बनणार आहे. ज्याच्यावर आगामी Maruti e Vitara देखील तयार केली जात आहे.
पॉव्हरट्रेनचा विचार केला तर Maruti YMC मध्ये e Vitara वाले 49kWh आणि 61kWh बॅटरी पॅक दिले जाऊ शकतात. ही इलेक्ट्रीक सुव्हमध्ये छोट्या बॅटरी पॅकसह सुमारे 343 किमी (WLTP) आणि मोठ्या बॅटरी पॅकसोबत 543 किमी (ARAI) ची रेंज असू शकते.
इंडो- जपानी ऑटोमेकरने देशभरात 1,100 हून जास्त शहरात 2,000 हून अधिक चार्जिंग स्टेशन लावण्यात आलेली आहेत. कंपनीचे लक्ष्य 2030 पर्यंत त्यांच्या डीलर्स आणि चार्जिंग पॉईंट ऑपरेटर्स ( CPOs ) सोबत मिळून 1 लाखाहून जास्त EV चार्जिंग प्वाईंट्सचे नेटवर्क तयार केले आहे. याशिवाय Maruti Suzuki ने e Vitara लाँचच्या आधी e for me मोबाईल ऐप देखील लाँच केले आहे. हे ऐप Apple App Store आणि Google Play Store वर देखील उपलब्ध आहे. या ऐपद्वारे युजर्स Maruti Suzuki च्या चार्जिंग स्टेशन आणि पार्टनर नेटवर्कच्या चार्जिंग पॉईंट्सला एक्सेस करु शकतो.