MG Motor India : MG भारतात इलेक्ट्रिक कार आणणार, कमी किमतीत उत्कृष्ट लूक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

MG Motor India : MG भारतात  इलेक्ट्रिक कार आणणार, कमी किमतीत उत्कृष्ट लूक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: twitter

महिंद्रासह इतर अनेक कंपन्या भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कार ऑफर करतील याची प्रदीर्घ प्रतीक्षा होती.

शुभम कुलकर्णी

|

May 13, 2022 | 8:53 AM

दिल्ली : भारतात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) अलीकडेच येतायेत. भारतात इलेक्ट्रिक कारची (Car) विक्री देखील वाढली आहे. पण,  स्वस्त इलेक्ट्रिक कारची मागणी जास्त होऊ लागली आहे. तुम्हा-आम्हाला परवडेल, अशा स्वस्ताच्या कारची मागणी आता होऊ लागली आहे. बरं आता स्वस्त म्हणाल तर अशी इलेक्ट्रिक कार एक आहे. ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. महिंद्रासह (mahindra) इतर अनेक कंपन्या भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कार ऑफर करतील याची प्रदीर्घ प्रतीक्षा होती. मात्र, तो विचार विचारच राहिला आणि आतापर्यंत असं झालेलं नाही. आता बातमी येत आहे की, MG Motor India लवकरच एक छोटी इलेक्ट्रिक कार MG E230 आणू शकते. फक्त दोन दरवाजे या कारला असतील, अशी महिती सूत्रांकडून मिळतेय. MG ची आगामी बजेट इलेक्ट्रिक कार MG E230 चा लूक आणि फीचर्स काय असती ते पाहुया…

पुढच्या वर्षी येणार नवी कार

MG Motor India  ची इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. 2-डोर EV लाँच करू शकते. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, MG E230 ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर विकसित केलं जाईल. MG च्या या छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये 20kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. जो एका चार्जवर 150 किमी पर्यंतची रेंज देईल. त्याची बॅटरी वॉटरप्रूफ असेल आणि स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्ज असेल.

कारमध्ये काय विशेष?

MG ची आगामी इलेक्ट्रिक कार MG E230 चांगली दिसेल आणि ती भारतीय रस्त्यांना अनुरूप असणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, MG E230 मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, इंटरनेट ऑफ व्हेइकल्स, ऑटोमॅटिक पार्किंग, व्हॉईस कमांड, तसेच ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD आणि रीअर पार्किंग यासह अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह अनेक मानक वैशिष्ट्ये मिळतील. MG ची ही छोटी इलेक्ट्रिक कार 10 लख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रेंजमध्ये लाँछ केली जाऊ शकते.

कमी किंमत असणार

महिंद्रासह इतर अनेक कंपन्या भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कार ऑफर करतील याची प्रदीर्घ प्रतीक्षा होती. मात्र, तो विचार विचारच राहिला आणि आतापर्यंत असं झालेलं नाही. आता बातमी येत आहे की, MG Motor India लवकरच एक छोटी इलेक्ट्रिक कार MG E230 आणू शकते. फक्त दोन दरवाजे या कारला असतील, अशी महिती सूत्रांकडून मिळतेय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें