नवीन Bajaj Pulsar NS400Z लाँच, आता मिळेल नवीन 5 – इंचाचा TFT डिस्प्ले आणि अनेक नवे फिचर्स
Bajaj Pulsar NS400Z लाँच झाली आहे. यात आता नवीन फिचर्सचा समावेश असून किंमत आधीच्या मॉडेलपेक्षा थोडी अधिक आहे.

नवीन बजाज पल्सर लाँच झाली आहे.नव्या Bajaj Pulsar NS400Z मध्ये अनेक नवे फिचर्स आहेत. नव्या अपडेटमध्ये इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड फिचर्सवर विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. या नव्या बजाज पल्सर NS400Z ला 1,90,015 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) मध्ये लाँच केले आहे. हे लाँट डिलरशिपवर नवीन TFT कंसोल दिसल्याच्या एक आठवड्यानंतर झाले आहे. अपडेटमध्ये इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड फिचर्सवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ज्यामुळे फ्लॅगशिप पल्सर उर्वरित रिफ्रेश्ड लाईन-अपच्या बरोबर आली आहे.
बजाज पल्सर एनएस 400 झेड : फीचर्स
NS400Z मध्ये आतापर्यंत होणाऱ्या बॉन्डेड-ग्लास कलर एलसीडीची जागी 5 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात आळीपाळीने नेव्हीगेशनसाठी गुगल मॅप्स मिररिंग, म्युझिक कंट्रोल, डॉक्युमेंट स्टोरेज आणि लॅप टायमर सारखी सुविधा मिळते. रायडर्स नवीन इंटरफेसद्वारे चार रायडिंग मोड्सचा वापर करु शकतात. आणि ट्रॅक्शन कंट्रोलला थेट मॅनेज करु शकतात.
कनेक्टिव्हीटी ब्ल्यूटूथच्या माध्यमातून होते आणि एक युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट देखील जोडला आहे. बजाजने पॅनिक ब्रेक अलर्ट सिस्टीम देखील सादर केली आहे. जी वेगाने ब्रेक लावल्यानंतर पाठून येणाऱ्या वाहनांना इशारा देण्यासाठी हॅझर्ड लाईट्सना एक्टिव्ह करते.
या वर्षी पल्सर कुटुंबातील सर्व मॉडेलमध्ये ५ इंचाचा टीएफटी डिस्प्लेचा हळूहळू समावेश केला आहे. आधी एन 160 एसएसमध्ये नंतर पल्सर 125 आणि 150 मध्ये आणि आता एनएस 400 झेडमध्ये
NS400Z इंजिन
NS400Z मध्ये उर्वरित सर्वकाही बदलण्यात आहे. 349 सीसीचे सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन 9,000 आरपीएमवर 40 हॉर्सपॉवर आणि 7,500 आरपीएमवर 33 एनएमचा टॉर्क जनरेट करतो, जे 6-स्पीड गियरबॉक्ससोबत येते. इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी, चार राईड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, 43 मिमी यूएसडी फ्रंट फोर्क, डुअल-चॅनल एबीएस आणि रेडियल टायर सारखे सध्याच्या फिचर्सना कायम ठेवले आहे.
बाजारात स्थिती
अपडेटेड NS400Z ची किंमत 1.90 लाख रुपये आहे. ही त्याच्या आधीच्या मॉडेलहून थोडी जास्त आहे.ही किंमत याला जोडलेल्या TFT डिस्प्ले आणि कनेक्टेड फीचर्समुळे दिसते. ही बाईक 300-400cc नेकेड बाईक सेगमेंटमध्ये KTM 390 Duke सारख्या प्रतिस्पर्धी बाईकशी मुकाबला करते.
