Honda City 2023 नव्या रुपात होणार सादर, बदल आणि फीचर्सबाबत जाणून घ्या

होंडा सिटी 2023 लाँच होण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. कंपनीने याबाबत टीझर लाँच करत माहिती दिली आहे. नव्या होंडा सिटीमध्ये काय वैशिष्ट्ये असतील जाणून घ्या

Honda City 2023 नव्या रुपात होणार सादर, बदल आणि फीचर्सबाबत जाणून घ्या
Honda City 2023 ची उत्सुकता शिगेला, 2 मार्चला होणार लाँच जाणून काय असेल खासियत
Image Credit source: Honda
| Updated on: Mar 01, 2023 | 6:49 PM

मुंबई : होंडा सिटीच्या नव्या मॉडेलबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. आता उत्सुकता काही तासातच संपणार आहे. कारण कंपनीने ही गाडी 2 मार्च 2023 रोजी लाँच करणार असल्याचं सांगितलं आहे. तत्पूर्वी कंपनीने टीझरद्वारे ग्राहकांची उत्सुकता ताणली आहे. होंडाची नवी गाडी पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसत आहे. मात्र असं असलं तरी कंपनीने बेसिक डिझाईन कायम ठेवलं आहे. होंडा सिटीच्या स्टाईलबाबत बोलायचं झालं तर यात तसा काही बदल नाही. 9 एलईडी इनलाइन शेलसह एलईडी हेडलँप आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट सध्याच्या मॉडेलसारखीच आहे.

झेड शेप 3डी एलईडी टेललाईट आणि 16 इंचांचे अलॉय व्हीलही आहे तसेच आहेत. पण मागच्या पुढच्या बंपरमध्ये काही बदल निश्चितच केले आहे. नव्या सेडानमध्ये आकर्षक फ्रंट ग्रिल असेल.त्याचबरोबर क्रोम स्लॅट पहिल्यापेक्षा अधिक स्लीक असेल. मागील रिफ्लेक्टर थोडं खाली करण्यात आलं आहे. या गाडीची स्पर्धा मारुती सियाझ आणि ह्युंदाई वर्ना या गाड्यांशी असेल.

नव्या होंडा सिटीच्या केबिनमध्ये नव्या अँबियंट लाइटिंग, फ्रेश अपहोल्स्ट्री, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसारखे फीचर्स आहेत. या व्यतिरिक्त केबिन पूर्वीसारखीच असणार आहे. होंडा सिटी फेसलिफ्ट इंजिन पर्यायासह भारतात लाँच केली जाईल.

होंडा सिटीच्या नव्या गाडीत 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि सीव्हीटीसह 1.5 लिटर i-VETC पेट्रोल इंजिन मिळू शकते. या व्यतिरिक्त 1.5 लिटर एटकिंसन सायकल DOHC i-VETC पेट्रोल इंजिनला स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानासह सादर केलं जाऊ शकतं. पॉवर ट्रान्समिशनसाठी यात e-CVT पर्याय असेल.

रियल ड्रायव्हिंग एमिशन नियमानुसार अपकमिंग सेडान मॉडेलमध्ये डिझेल पर्याय नसू शकतो. कारण जापानी कंपनी आपलं डिझेल इंजिन अपग्रेड करणार नाही, अशीच शक्यता आहे.