बंगळुरुत Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड सुरु, जाणून घ्या तुमच्या शहराचा नंबर कधी

| Updated on: Nov 13, 2021 | 2:52 PM

ओला इलेक्ट्रिकने गुरुवारी आपल्या ग्राहकांसाठी S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी टेस्ट राइड्स सुरू केल्या आहे, ज्याची भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये खूप चर्चा आहे.

बंगळुरुत Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड सुरु, जाणून घ्या तुमच्या शहराचा नंबर कधी
Ola electric scooter
Follow us on

मुंबई : ओला इलेक्ट्रिकने गुरुवारी आपल्या ग्राहकांसाठी S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी टेस्ट राइड्स सुरू केल्या आहे, ज्याची भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये खूप चर्चा आहे. Ola S1 आणि S1 Pro व्हेरिएंटसाठी ऑगस्टमध्ये रिझर्व्हेशन सुरू करण्यात आले होते आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही दिवसांसाठी शॉपिंग विंडो उघडण्यात आली होती. (Ola S1 Electric Scooter test rides open in Bengaluru)

पुढील शॉपिंग विंडो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार होती परंतु आता 16 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, कारण ज्यांनी आधीच पेमेंट प्रक्रिया सुरू केली आहे त्यांच्यासाठी डिलिव्हरीची अंतिम मुदत कंपनीला पूर्ण करायची आहे. Ola S1 आणि S1 Pro स्कूटर्ससाठी टेस्ट राइड प्रतीक्षेत आहे कारण अनेक लोक ज्यांनी युनिट बुक केले आहे त्यांना खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी उत्पादनावर एक नजर टाकायची आहे. ज्यांनी खरेदी सुरू केली आहे त्यांनीही टेस्ट राईडची चौकशी करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

बंगळुरूमधील बरेच लोक गुरुवारपासून सुरू झालेल्या टेस्ट राइड इव्हेंटमध्ये सहभागी झाले आहेत. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले आहे की, “बंगळुरूमधील आमच्या टेस्ट राइड कॅम्पमध्ये ग्राहकांना Ola S1 चालवताना पाहून खूप आनंद झाला. लवकरच ही टेस्ट राईड मोहिम इतर शहरांमध्ये सुरु केली जाईल!” याचा अर्थ हे स्पष्ट झाले आहे की, लवकरच ओला इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड बंगळुरू व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये सुरु केली जाऊ शकते.

Ola इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट घेण्यासाठी, ग्राहकांना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असेल, ज्यासाठी ऑर्डर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्मेट आवश्यक असेल. ओला इलेक्ट्रिकने सल्ला दिला आहे की वापरकर्त्यांनी त्यांच्या स्लॉटवर बुकिंगच्या वेळेपेक्षा थोडे आधी पोहोचावे. दिल्ली, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये लवकरच टेस्ट राईड मोहिम सुरु होण्याची अपेक्षा आहे. ज्या लोकांनी ओला इलेक्ट्रिकसाठी अॅडव्हान्स पेमेंट केलं असेल त्यांनाच टेस्ट ड्राइव्हची संधी मिळेल.

स्कूटरच्या किंमती

Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत, जिथे Ola S1 ची किंमत 99,999 रुपये इतकी आहे, तर Ola S1 Pro ची किंमत 1.29 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरमध्ये काय आहे खास?

ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.

एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Ola S1 Electric Scooter test rides open in Bengaluru)