AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cheapest Bikes : दिवाळीत बाईक घेण्याची योजना असेल तर या आहेत देशाच्या सर्वात स्वस्त 5 बाईक, किंमत 58 हजाराने सुरु

दिवाळी आणि सणासुदीत घरी नवीन बाईक आणण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. टु व्हीलर आज गरजेचे साधन झाले आहे. मात्र, बजेट मर्यादित असल्याने अनेक जण बाईक घेण्याची योजना पुढे ढकलत आहेत. मात्र, या कमी बजेटच्या बाईक तुम्हाला आवडतील कोणत्या ते वाचा...

Cheapest Bikes : दिवाळीत बाईक घेण्याची योजना असेल तर या आहेत देशाच्या सर्वात स्वस्त 5 बाईक, किंमत  58 हजाराने सुरु
Hero HF 100
| Updated on: Sep 28, 2026 | 8:03 PM
Share

जर तुमचे बजेट कमी असेल तर आणि या दिवाळी आणि फेस्टीव्ह सिझनला नवीन मोटर सायकल खरेदी करु इच्छीत असाल तर बाजारात अनेक कॉम्प्युटर बाईक उपलब्ध आहेत, ज्यांची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सुमारे ५८ हजार रुपयांपासून सुरु होते. यात १०० सीसी पासून ११० सीसी पर्यंतच्या इंजिनवाल्या बाईकचा समावेश आहे. तसेच मायलेज देखील रोजच्या वापरासाठी चांगले आहे.

Hero HF 100: सर्वात कमी बजेटमध्ये नवीन बाईक

कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करायची असेल तर हिरो एचएफ १०० सर्वात स्वस्तातील पयार्य सामील आहेत. सप्टेंबर २०२६ मध्ये या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत सुमारे ५७,७१९ आहे. यामुळे या यादीतील ही सर्वात कमी किंमत असलेली ही बाईक आहे.

इंजिन आणि लायलेज

हीरो एचएफ १०० मध्ये ९७.२ सीसी एअर -कूल्ड, सिंगल – सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन सुमारे ८ पीएसची पॉवर देते. कंपनीच्या मते ही बाईकसुमारे ६५-७० kmpl चे मायलेज देते. मात्र,परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतो.

फीचर्स 

यात ९७.२ सीसी इंजिनासोबत ४-स्पीड गिअरबॉक्स, हलके वजन, एलॉय व्हील, ड्रम ब्रेक, इंटेग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीमचा समावेश आहे. रोजच्या शहरी वापरासाठी ही बाईक चांगली आहे.

Hero HF Deluxe: ६० हजाराहून कमी किंमतीची बाईक

या यादीत दुसरी स्वस्तातील बाईक एचएफ डीलक्स आहे,ज्याची सुरुवातीची किंमत ५९,९९८ एक्स शोरुम ( दिल्ली ) पासून सुरु होते.

इंजिन आणि मायलेज

एचएफ डीलक्समध्ये ९७.२ cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन मिळते. हे इंजिन ५.९kW च्या कमाल पॉवर आणि ८.०५ Nm चा टॉर्क देते. बाईकमध्ये ४ – स्पीड गिअरबॉक्स मिळतो. हिरोच्या वेबसाईटवर एचएफ डीलक्सचा ARAI मायलेज ६८ kmpl सांगितला आहे.

फिचर्स

एचएफ डीलक्सच्या काही व्हेरिएंटमध्ये i3S Idle Stop-Start System मिळते. जे ट्रॅफीकमध्ये बाईक दीर्घ काळ उभे राहिल्यावर इंजिनला बंद करुन इंधन वाचवण्यास मदत करते. या शिवाय xSENS फ्यूईल इंजेक्शन, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, रिअर एडजस्टेबल शॉक एब्जॉर्बर आणि IBS सारखे फिचर्स मिळतात. रोजच्या ऑफीस, कॉलेज वा बाजारात येण्या-जाण्यासाठी ही १०० सीसी कॉम्प्युटर बाईक एक बजेट पर्याय आहे.

TVS Sport: ६५ हजाराच्या आसपास 110cc बाईक

जर तुम्ही कमी किंमतीत थोड्या मोठ्या इंजिनाची बाईक हवी तर टीव्हीएस स्पोर्ट्सवर नजर टाकू शकतात. सप्टेंबर २०२६ मध्ये याची सुरुवातीची किंमत सुमारे ६५,४५० एक्स -शोरुम आहे.

इंजिन आणि मायलेज

टीव्हीएस स्पोर्ट्समध्ये १०९.७सीसी ड्युरालाईफ इंजिन दिले आहे. हे इंजिन सुमारे ८.१९ पीएस कमाल पॉवर देते. आणि ४ – स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. उपलब्ध स्पेसिफिकेशननुसार ही बाईक ७० केएमपीएलचा मायलेज देते.

फिचर्स

यात १०९.७ सीसी इंजिनासह ४-स्पीड गिअरबॉक्स, ETFi टेक्नोलॉजी, लांब सीट, ट्यूबलेस टायर, कॉम्प्युटर डिझाईन देण्यात आले आहे. टीव्हीएसच्या मते स्पोर्ट्समध्ये ETFi टेक्नोलॉजी दिली असून ज्याचा उद्देश्य चांगला मायलेज आणि स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव देणे आहे.

Honda Shine 100: ६९  हजाराहून कमी किंमत

होंडाची एंट्री लेव्हर कॉम्प्युटर बाईक शाईन १०० देखील कमी बजेट वाल्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे. हीची किंमत ६८,७६७ एक्स शोरुम ( दिल्ली )आहे. होंडाने या किंमतीवर OBD2B अपडेटेड मॉडेल सादर केले होते.

इंजिन आणि मायलेज

शाईन १०० मध्ये ९८.९८ सीसी एअर कूल्ड , सिंगल सिलिंडर, फ्युअर इंजेक्टेड इंजिन दिले आहे. हे ५.४३ केडब्ल्यूची पॉवर देते आणि ८.०४ एनएमचा टॉर्क देते. यात ४ – स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ARAI आधारित आकड्यांनुसार याचे मायलेज सुमारे ६५ केएमपीएल आहे. वास्तविक मायलेज परिस्थितीनुसार बदलू शकते.

फिचर्स

या बाईकमध्ये ९८.९८ सीसी इंजिन, फ्युअल इंजेक्शन टेक्नॉलॉजी, OBD2B कंप्लायंट इंजिन, एलॉय व्हील, CBS म्हणजे कंबाईंड ब्रेकींग सिस्टीम, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्विन रिअर शॉक एब्जॉर्बर, लांब सिंगल पीस सीट आणि ५ कलर पर्याय मिळतात. होंडा शाईन १०० चा फोकस जास्त फिचर्स ऐवजी हलके वजन, आराम आणि रोजच्या वापराची बाईक यावर आहे.

Bajaj Platina 100: 70 kmpl च्या आसपास मायलेज

या यादीत पाचव्या क्रमांकावर बजाज प्लेटिना 100 आहे. याच्या कंपनी वेबसाईटवर दिल्लीतील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७२,९४२ सांगितली आहे.

इंजिन आणि मायलेज

प्लेटिनामध्ये ९९.५९ cc, ४-स्ट्रोक DTS-i, सिंगल-सिलिंडर इंजिन मिळते. हे ८.२ PS ची कमाल पॉवर आणि८.३ Nmचे टॉर्क देते. बाइकमध्ये ११ लिटरचे फ्यूअल टँक मिळतो. हीचा मायलेज ७० केएमपीएल आहे.

फिचर्स

या प्लेटिना १०० मध्ये कम्फर्ट टेक्नोलॉजी, लांब आणि सॉफ्ट सीट, चांगले शॉक एब्जॉर्बर, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि एलईडी डीआरएलचा समावेश आहे. बाईक खराब आणि खडबडीत रस्त्यावर आरामदायक रायडिंगला ध्यानात ठेवून तयार केली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...