भारतात आज लॉन्च होणार Renault kiger, काय आहे धमाकेदार SUV ची किंमत आणि फीचर्स

| Updated on: Feb 15, 2021 | 11:51 AM

रेनॉ कायगर ही कार 15 फेब्रुवारीला म्हणजेच आज लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, काही डीलर्सनी ही कार अधिकृतपणे लाँच करण्यापूर्वी या कारसाठी बुकिंग सुरु केली आहे.

भारतात आज लॉन्च होणार Renault kiger, काय आहे धमाकेदार SUV ची किंमत आणि फीचर्स
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ग्राहकांना प्रतीक्षा असलेल्या Renault kiger या कारचं आज भारतामध्ये लाँचिंग होणार आहे. रेनॉ कायगर ही कार 15 फेब्रुवारीला म्हणजेच आज लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, काही डीलर्सनी ही कार अधिकृतपणे लाँच करण्यापूर्वी या कारसाठी बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने चेन्नईतील फॅसिलिटी सेंटरमध्ये त्यांच्या या गाडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. (renault kiger launch in india today know cost and features of powerful suv car)

या कारची सुरुवातीची किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारचं प्रोडक्शन मॉडल गेल्या महिन्यातच तयार करण्यात आलं आहे. रेनॉ कंपनीने त्यांची Kiger ही कार दिवसांआधी सादर केली होती. या कारची विक्री मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. पण अद्याप कार खरेदी करण्यावरून ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला यासबंधी काही महत्त्वाची माहिती देणार आहोत.

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त एसयूव्ही?

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे. याआधी Nissan Magnite या कंपनीची एसयूव्ही असणारी कार नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault तयार करत असलेली Kiger या कारची किंमत सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे. (renault kiger launch in india today know cost and features of powerful suv car)

संबंधित बातम्या – 

टोलनाक्यांवर Fastag बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल, आता तुम्हीच ठरवा काय करायचं…!

टेस्ला मोटर्सचा भारतात मोठा प्लॅन, ‘या’ राज्यात सुरू करणार उत्पादन केंद्र

Nissan Kicks वर मिळतोय चक्क 95 हजार रुपयांचा डिस्काऊंट, जबरदस्त आहे फीचर

(renault kiger launch in india today know cost and features of powerful suv car)