Nissan Kicks वर मिळतोय चक्क 95 हजार रुपयांचा डिस्काऊंट, जबरदस्त आहे फीचर

तुम्हीदेखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल निसान किक्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Nissan Kicks वर मिळतोय चक्क 95 हजार रुपयांचा डिस्काऊंट, जबरदस्त आहे फीचर
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:14 PM

नवी दिल्ली : कार प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, Nissan Kicks या जबरदस्त कारवर तब्बल 95 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही खास ऑफर निसानकडून कॅश बेनिफिट, एक्सचेंज डिस्काउंट आणि लॉयल्टी बेनिफिटच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. तुम्हीदेखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल निसान किक्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण सध्या मारुती, महिंद्रा, टाटा, ह्युंदाई आणि रेनो अशा सर्व कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. (nissan kicks discounts up to 95 thousand rupees here is the full details and features)

Nissan Kicks वर जबरदस्त डिस्काऊंट

Nissan Kicks वर 25 हजार रुपयांचा कॅशबॅक डिस्काऊंट देण्यात आला आहे. यासोबतच निसानकडून या कारवर 50 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या कंपनीने Nissan Kicks वर 20 हजार रुपयांचा लॉयल्टी बेनिफिटदेखील दिला आहे. यामुळे कारमध्ये एकूण 95 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

दमदार इंजिनांचा पर्याय

निसान किक्सची एक्स शोरुम किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड, 4 सिलिंडर इंजिन 104hp पॉवर आणि 142Nm टॉर्क जनरेट करतं. तसेच यासोबत 5 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. तसेच 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनाचा दुसरा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 154hp पॉवर आणि 254Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनासह 6 स्पीड मॅनुअल किंवा 7 स्टेप CVT उपलब्ध आहे.

सेफ्टी फीचर्स

निसान किक्समध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमरा, ड्युअल एयरबॅग्स, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट वॉर्निंग, सीटबेल्ट वॉर्निंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात या कारची ह्युंदाय क्रेटा, किआ सेल्टोस आणि रेनॉल्ट डस्टर या कार्ससोबत टक्कर सुरु आहे. (nissan kicks discounts up to 95 thousand rupees here is the full details and features)

संबंधित बातम्या – 

2021 MG Hector SUV भारतात लाँच, किंमत किती?

केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

MG Hector चं नवं वेरियंट उद्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(nissan kicks discounts up to 95 thousand rupees here is the full details and features)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.