MG Hector चं नवं वेरियंट उद्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने अजून एका वेरियंटसह हेक्टर लाईन-अपचा (2021 MG Hector) विस्तार करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

MG Hector चं नवं वेरियंट उद्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:20 PM

मुंबई : एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने अजून एका वेरियंटसह हेक्टर लाईन-अपचा (2021 MG Hector) विस्तार करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यावेळी कंपनी एमजी हेक्टर CVT ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह सादर करणार आहे. या कारचं नवीन वेरियंट 11 फेब्रुवारी 2021 ला लाँच केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने हेक्टरचं फेसलिफ्ट वर्जन सादर केलं होतं. आता काहीच दिवसांत कंपनी नवीन CVT वेरियंट सादर करत आहे. (2021 MG Hector Petrol CVT variant Launch on 11 February compete with Hyundai Creta Kia Celtos)

कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे आणि यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं जाईल. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं. नव्या ट्रान्समिशन अपडेटसह एमजी इंडिया हेक्टरची किंमत जवळपास 50,000-60,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

CVT वेरियंट शहरात राहणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करेल, असा विश्वास कंपनीला वाटतो. ही कार शहरांमध्ये चालवण्यासाठी परफेक्ट आहे. त्यानुसार ही ही कार डिझाईन करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. CVT युनिट डीसीटी वेरियंटच्या तुलनेत अधिक दमदार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

किंमत

कंपनी या वर्षीच्या मध्यात सात सीटर हेक्टर लाँच करणार होती, परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे कंपनीने या कारचे लाँचिंग पुढे ढकलले. भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख ते 18.68 लाख रुपयांपर्यंत आहे. या CVT युनिट 2021 एमजी हेक्टरची किंमत 50 ते 60 हजारांनी कमी असू शकते. MG Hector Plus 7 Seater ची किंमत 6 सीटर मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी अधिक असू शकते, असे बोलले जात आहे. ही कार महिंद्राची अपकमिंग एसयूव्ही New Mahindra XUV500 आणि टाटा मोटर्सची आगामी एसयूवी Tata Gravitas ला टक्कर देणार आहे.

शानदार फिचर्स

हेक्टरकडे स्वतःचे असे अनेक फिचर्स आहेत. कारच्या बाहेरील प्रोफाईलवर एक मोठं ग्रिल, स्वतःची एलईडी डीआरएल शैली, नवीन स्किड प्लेट आमि क्रोम आहे. यामध्ये अपडेटेड आय स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि ड्युल-टोन अपहोल्स्ट्री मिळते. सहा-सीटर हेक्टर अधिक प्रिमीय दिसते. त्यामुळे हेक्टरच्या सात-सीटर एडिशनची सध्या जोरदार चर्चा आहे.

दमदार इंजिन

MG Hector Plus 7 Seater ही कार 6 सीटर एमजी हेक्टर प्लस प्रमाणे तीन इंजिन पर्यांयासोबत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येते. तर 2.0 लीटर डिझेल इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतं.

इतर फीचर्स

या कारच्या सीट पोझिशनमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये सीट्सच्या दुसऱ्या ओळीत (दुसरी रो) 60.40 प्रमाणे सीट असणार आहे. तर थर्ड रोच्या सीट स्लायडिंग फिचर्ससोबत असणार आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर सीट, स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, पॅनारेमिक सनरूफ, कनेक्टेड व्हेईकल टेक्नोलॉजी, मल्टी फंक्शन स्टियरींग व्हीलसोबत सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटर, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

एमजी कार्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

एमजीने अगोदरच भारतात नवीन हेक्टर फेसलिफ्टची टेस्टिंग सुरु केली आहे. दरम्यान ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे एमजीनेदेखील नुकतीच घोषणा केली आहे की, जानेवारी महिन्यात ते त्यांच्या किंमतींमध्ये संशोधन करतील, हा प्रोडक्ट पोर्टफोलियोचा भाग असेल. असे सांगण्यात येत आहे की, एमजीच्या कारच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. मॉडेलच्या आधारावर तीन टक्क्यांपर्यंत किंमती वाढवल्या जाऊ शकतात

हेही वाचा

Mahindra Thar प्रेमींसाठी वाईट बातमी, उत्पादन मंदावलं, वेटिंग पिरियड वाढणार?

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लाँच होणार रेनॉ Kiger, डीलर्सकडून बुकिंग सुरु

अवघ्या 6 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात

Safety Features नसतील तर कार उत्पादन बंद करा; ऑटो कंपन्यांबाबत सरकारची कठोर भूमिका

(2021 MG Hector Petrol CVT variant Launch on 11 February compete with Hyundai Creta Kia Celtos)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.