टेस्ला मोटर्सचा भारतात मोठा प्लॅन, ‘या’ राज्यात सुरू करणार उत्पादन केंद्र

जिल्ह्यामध्ये औद्योगिक कॉरिडोरही बांधला जाणार आहे. याची किंमत सुमारे 7,725 कोटी असणार आहे. तर यामुळे 2.8 लाख लोकांना रोजगार मिळेल.

टेस्ला मोटर्सचा भारतात मोठा प्लॅन, 'या' राज्यात सुरू करणार उत्पादन केंद्र
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:49 AM

नवी दिल्ली : जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला (Telsla) भारतात आता आपलं जाळं मोठं करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एका राज्याची निवड केली असून तिथे कंपनी आपलं उत्पादन युनिट उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी अधिकृतपणे दिलेल्या मागहितीनुसार, टेस्ला ही एलोन मस्कची (Elon Musk) जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी कर्नाटकमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी ही माहिती एका निवेदनामार्फत दिली आहे. (tesla electric car company will set up electric car manufacturing plant in karnataka)

दिलेल्या माहितीनुसार, तुमकूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक कॉरिडोरही बांधला जाणार आहे. याची किंमत सुमारे 7,725 कोटी असणार आहे. तर यामुळे 2.8 लाख लोकांना रोजगार मिळेल. अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनीने जानेवारीमध्ये यासाठी भारतात कंपनीची नोंदणी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्लाने बेंगळुरू शहरातही संशोधन आणि विकास केंद्र उघडलं आहे.

टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु इथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे.

आरओसी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, “टेस्लाने 8 जानेवारी रोजी बेंगळुरू येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजसह (आरओसी) त्यांच्या अधिकृत भारतीय कंपनीची नोंदणी केली आहे. नोंदणी करताना कंपनीने आरओसीकडे अधिकृत भारतीय भांडवल 15 लाख रुपये आणि एक लाख रुपये पेड-अप भांडवल भरले आहेत. सिटी सेंटरमध्ये विभव तनेजासह टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी लिमिटेड या नावाने कंपनी सुरु करण्यात आली आहे. वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फाइन्स्टाईन यां कंपनीचे संचालक असतील.

तनेजा टेस्ला इंडियाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत, तर फाइन्स्टाईन टेस्लामध्ये वरिष्ठ संचालक (ग्लोबल ट्रेड न्यू मार्केट) आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ट्वीट केले आहे की, “टेस्ला लवकरच भारतात उत्पादन सुरु करणार आहे. त्यासाठी कंपनी बंगळुरू येथे संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र सुरू करीत आहे”. दरम्यान, टेस्लाला बंगळुरुत आमंत्रित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जोरदार प्रयत्न केले होते.

येडियुरप्पा यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताचा प्रवास सुरु झाला आहे आणि या प्रवासाचं नेतृत्व कर्नाटक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला लवकरच बंगळुरुत एका आर अँड डी युनिटसह कामाला सुरुवात करणार आहे. मी एलन मस्क यांचं भारतात आणि कर्नाटकात स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो”. भारतात उत्पादन करण्यासाठी टेस्ला कंपनी महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या इतर राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे.

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक ट्वीट करुन टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, टेस्ला कंपनी 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. मस्क यांनी एका ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की, निश्चितपणे आमची कंपनी पुढील वर्षात भारतात प्रवेश करेल. (tesla electric car company will set up electric car manufacturing plant in karnataka)

संबंधित बातम्या – 

नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

Maruti Suzuki च्या उत्पादनात घट, प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठं नुकसान

Nissan Kicks वर मिळतोय चक्क 95 हजार रुपयांचा डिस्काऊंट, जबरदस्त आहे फीचर

2021 MG Hector SUV भारतात लाँच, किंमत किती?

(tesla electric car company will set up electric car manufacturing plant in karnataka)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.