
योगेश नावाचा तरुण हा नोएडा येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याला अनेक दिवसांपासून रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याची इच्छा होती. पण बजेटमुळे त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण जीएसटी परिषदेने वस्तू आणि सेवा करमध्ये (GST) मोठी सुधारणा झाली. या सुधारणेत त्याची ड्रीम बाईक खरेदीचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. नवीन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 त्याने खरेदी केली. त्याने दावा केला आहे की 20 हजार रुपयांची बचत झाली.
गेल्या काही दिवसांपासून योगेश हा बाईक खरेदी करु इच्छित होता. 100-125 सीसीची मोटारसायकल अथवा स्कूटर खरेदी करण्याचे त्याचे प्लॅनिंग होते. त्यासाठी बजेट पण कमी लागते आणि मेंटनेंस पण इतका लागत नाही. पण त्याने जेव्हा मित्रांना त्याचा विचार बोलून दाखवला, तेव्हा त्यांनी दमदार बाईक खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते मध्यमवर्गीय माणूस त्याच्या आयुष्यात दोनदा बाईक खरेदी करतो. एकदा तो तरुण असताना बाईक खरेदी करतो. मग चारचाकी खरेदी करतो. त्यानंतर त्याचा मुलगा जेव्हा वयात येतो. तेव्हा त्याच्यासाठी तो दुसरी बाईक खरेदी करतो.
GST मध्ये सूट, मग स्कूटर-बाईक सोडून घेतली बुलेट
योगेशला बुलेट खरेदी करायची होती. त्यातच केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करात, GST मध्ये कपातीचा निर्णय जाहीर केला. त्यात 350 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकीवरील जीएसट 28 टक्क्यांहून थेट 18 टक्क्यांवर आला. त्यामुळे रॉयल एनफील्डच्या पोर्टफोलियोत अनेक बाईक्सवरील किंमतीत मोठी कपात जाहीर झाली. मित्रांच्या सल्ल्यानंतर मग योगेशने बुलेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तो गेल्या काही दिवसांपासून हे स्वप्न उराशी बाळगून होता. त्यासाठी पैशांचं गणित काय असेल याची जुळवाजुळव त्याने सुरू केली.
बुलेट 350 ची किंमत अजून किती कमी झाली याचा योगेश अंदाज बांधत होता. त्याला वाटले फारतर 10 हजार रुपयांपर्यंत कपात झाली असेल. पण जेव्हा तो रॉयल एनफिल्डच्या शोरूमला गेला. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. बुलेटची ऑनरोड किंमत जवळपास 2.10 लाख रुपये होती. पण जीएसटीत मोठा बदल झाल्याने नवीन बुलेटची किंमत 1.90 लाख रुपये झाल्याची आनंदवार्ता त्याला सांगण्यात आली. तर फेस्टिव्ह सीजनचाही लाभ त्याला देण्यात आला. एक गिफ्टही मिळाले. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावला नाही. एका बुलेट खरेदीवर 20 हजारांची बचत झाली. ही रक्कम सर्वसामान्यासाठी महत्त्वाची असल्याचे तो सांगतो.