कर्ज घेऊन कार खरेदी करायची आहे का? ‘ही’ बँक बेस्ट

कार लोन घेण्यासाठी तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI निवडू शकता. SBI आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते.

कर्ज घेऊन कार खरेदी करायची आहे का? ‘ही’ बँक बेस्ट
SBI car Loan
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 12:04 PM

स्वत:ची गाडी असावी असे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते, पण कार खरेदी करणे ही सर्वसामान्यांसाठी मोठी गोष्ट असते. कार विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. सर्वसामान्य माणूस आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कार लोन घेतो.

वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदराने कार लोन दिले जाते. अशावेळी जर तुम्ही कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा बँकेकडून कार लोन घ्या, ज्याचे व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहेत.

कार लोन घेण्यासाठी तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI निवडू शकता. SBI आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते.

SBI कार लोन

एसबीआयच्या कार लोनच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर SBI च्या कार लोनचे सुरुवातीचे व्याजदर 9.10 टक्क्यांपासून सुरू होतात. आपली पात्रता आणि आपल्या सिबिल स्कोअरवर अवलंबून, हा व्याजदर जास्त असू शकतो.

SBI कडून 7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?

तुम्ही SBI कडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7 लाखांचे कार लोन घेत असाल आणि तुम्हाला हे लोन 7.10 टक्के व्याजदराने मिळत असेल तर तुम्हाला दरमहा 14,565 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही 5 वर्षात एकूण 8,73,891 रुपये बँकेला भराल. अशा वेळी तुम्ही एकूण 1,73,891 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्याल.

कार लोन घेण्यापूर्वी तुमचा पगार तपासा

अनेक जण कर्ज घेऊन कार खरेदी करतात पण नंतर ते गाडीचा EMI भरू शकत नाहीत. कारण त्यांच्या महिन्याच्या पगारातील अर्धा किंवा त्याहून अधिक हिस्सा EMI भरण्यात जातो. अशा वेळी बाकीचा खर्च करणे खूप अवघड होऊन बसते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कार लोन घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा पगार लक्षात ठेवला पाहिजे. कार लोन घेण्यापूर्वी तुमचा मासिक पगार किती असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.

‘हे’ सूत्र समजून घ्या

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा.

जर तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपये असेल तर तुमच्याकडे 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक EMI असणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)