Toyota Motor : टोयोटा कंपनीला ग्लोबल चेहरा देणारा मालक काळाच्या पडद्याआड

| Updated on: Feb 15, 2023 | 7:38 PM

Toyota Motor : टोयोटा कंपनीला जागतिक ओळख देणारे मालक काळाच्या पडद्याआड गेले. या कंपनीच्या मुळ मालकाने मोठ्या कष्टाने ही कंपनी उभी केली होती. त्यानंतर शोइचिरो टोयोटा यांनी या कंपनीला जागतिक ओळख दिली.

Toyota Motor : टोयोटा कंपनीला ग्लोबल चेहरा देणारा मालक काळाच्या पडद्याआड
Follow us on

नवी दिल्ली : टोयोटा कंपनीचे मानद संचलाक आणि कंपनीचे संस्थापक किईचिरो टोयोटो यांचे पुत्र शाइचिरो टोयोटा (Shoichiro Toyoda) काळाच्या पडद्याआड गेले. ते 97 वर्षांचे होते. मंगळवारी हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू ओढावला (Passed Away). टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने (Toyota Motor Corporation) याविषयीची अधिकृत माहिती दिली. किईचिरो टोयोटो यांचे ते धाकटे पुत्र होते. 1937 साली किईचिरो टोयोटो यांनी ही टोयोटा कंपनीची स्थापना केली. अकिईओ टोयोटा यांच्याकडे आता पुढील काराभाराची सूत्र हाती आली आहे. ते अध्यक्ष म्हणून कंपनीचा गाडा हाकतील. जपानमधील अत्यंत सामान्य कुटुंबातील टोयोटा यांच्या वडिलांनी जपानची स्वतःची मालवाहतूक आणि प्रवाशांसाठीची चारचाकी असावी असे स्वप्न पाहिले होते. जपानने परदेशातून वाहन आयात बंद व्हावी असे स्वप्न टोयोटा यांनी पाहिले होते.

जागतिक स्पर्धेत आणि बाजारात टोयोटाला नवीन चेहरा देण्याचे श्रेय शाइचिरो टोयोटा यांना देण्यात येते. त्यांनी कंपनीला जपान बाहेर नवीन ओळख करुन दिली. जागतिक बाजारात त्यांच्या कष्ट आणि रणनीतीमुळे टोयोटीची तुफान विक्री झाली. कटु संबंध झालेले असतानाही, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत त्यांनी टोयोटाचा पाया रोवला. टोयोटा अमेरिकेत तुफान लोकप्रिय झाली.

1982 साली शाइचिरो टोयोटा यांनी टोयोटाची धुरा संभाळली. त्यांनी वडिलांनी कष्टाने उभा केलेला ऑटोमोबाईल क्षेत्रातील हा प्रयोग जगभर नेला. दर्जा आणि दीर्घकालीन टिकण्यासाठी टोयोटा हा जोरदार ब्रँड असल्याचे अमेरिकन लोकांनी पावती दिली. टोयोटावर ग्राहकांच्या उड्या पडल्या. या कंपनीने अमेरिकेत विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले. अर्थात यामागे शाइचिरो टोयोटा यांची कल्पकता आणि प्रामाणिकपणा होता.

हे सुद्धा वाचा

जपानची स्वतःची कार असावी या ध्यासातून कोईचिरो टोयोटा यांनी 1933 साली कार बांधणीचा कारखाना सुरु केला होता. तोपर्यंत जपानमध्ये जीएम मोटर्स आणि फोर्डसच्या कारची आयात करण्यात येत होती. ही आयात थांबविण्याचे आणि जपानची स्वतःची कार उत्पादन कंपनी असण्याची मोठे स्वप्न कोईचिरो टोयोटा यांनी पाहिले होते.

अकिओ टोयोडा (Akio Toyoda) टोयोटा मोटर कॉरपोरेशन (TMC) च्या सीईओ पदावरुन हटतील आणि कंपनीचे अध्यक्ष पद सांभाळतील. टोयोटा मोटरमधील बदलानुसार, लेक्सस आणि गाजू रेसिंग (Lexus and Gazoo Racing) अध्यक्ष तर कोजी सातो (Koji Sato) टोयोटाच्या सीईओ पदासाठी एलिवेटेड झाले. टोयोटा कंपनीचे मानद संचलाक आणि कंपनीचे संस्थापक किईचिरो टोयोटो यांचे पुत्र शाइचिरो टोयोटा काळाच्या पडद्याआड गेले. ते 97 वर्षांचे होते. मंगळवारी हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू ओढावला . टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने  याविषयीची अधिकृत माहिती दिली.