AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Slavia सेडान मार्च 2022 मध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

स्कोडा (Skoda) ने पुष्टी केली आहे की, त्यांची नवीन सेडान स्लाव्हिया (Skoda Slavia) पुढील वर्षी मार्चमध्ये लॉन्च होईल. दरम्यान, स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता मावळली आहे.

Skoda Slavia सेडान मार्च 2022 मध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?
Skoda Slavia Car
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 26, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : स्कोडा (Skoda) ने पुष्टी केली आहे की, त्यांची नवीन सेडान स्लाव्हिया (Skoda Slavia) पुढील वर्षी मार्चमध्ये लॉन्च होईल. स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता मावळली आहे, त्यामुळे स्कोडा स्लाव्हिया रॅपिडची जागा घेईल असे मानले जात आहे. स्लाव्हिया स्कोडाच्या प्रीमियम सेडान लाइन-अपमध्ये सामील होईल, ज्यामध्ये ऑक्टाव्हिया आणि सुपर्बचाही समावेश आहे. (Skoda Slavia Sedan to launch in march 2022)

स्कोडाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्लाव्हियावरुन पडदा हटवला होता. लॉन्च केल्यावर, ही कार Honda City, Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि मिडसाईज सेडान सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

ही कार कंपनीच्या MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित असेल Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

(Skoda Slavia Sedan to launch in march 2022)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?