इलेक्ट्रिक गाड्यांसाठी भारतातील मार्केट नको बाबा! ‘स्कोडा’ने पाठ फिरवली

| Updated on: Mar 29, 2021 | 2:46 PM

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) कल वाढत चालला आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी भारतातील मार्केट नको बाबा! स्कोडाने पाठ फिरवली
Skoda
Follow us on

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार/बाईक कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. (Skoda will not launch electric car in India, said market is not ready for such vehicles right now)

दरम्यान, ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याने कंपनी भारतात तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टेस्ला ही जगभरात सर्वोत्तम लक्झरी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनीदेखील भारतात त्यांचा व्यवसाय सुरु करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत भारतात एकीकडे अशा प्रकारची सकारात्मकता असताना जागतिक बाजारातील एका आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे.

चेक रिपब्लीकची वाहन निर्माता कंपनी स्कोडाने खुलासा केला आहे की, ते अद्याप भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार लाँच करणार नाहीत. कंपनीला असे वाटते की, सध्या भारतीय बाजार अशा वाहनांसाठी तयार नाही. येथे अशा वाहनांच्या खरेदीचा खर्च खूप जास्त आहे. कंपनी भारतीय बाजारात रॅपिड आणि सुपर्बची विक्री करते. या व्यतिरिक्त कंपनी भारतात जूनमध्ये आपली एसयूव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. स्कोडाने इलेक्ट्रिक कार्सप्रमाणे डिझेल पॉवरट्रेनपासून स्वतःला दूर ठेवले आहे. कंपनी भारतीय बाजारात केवळ पेट्रोल कार लाँच करणार आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपाराय म्हणाले की, सध्या भारतात सामान्य लोकांसाठी इलेक्ट्रिक वाहने स्वस्त नाहीत. बॅटरीचे दर कमी झाले आहेत परंतु इंटरनल कम्बशन इंजिन कारशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाहीत. त्याला काही वर्ष लागतील. बोपाराय म्हणाले की सध्या भारतात इलेक्ट्रिक कारचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका

दुसऱ्या बाजूला ह्युंदाय कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी आगामी काळात अनेक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पँसेंजर व्हीकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कंपनीचा फोकस इलेक्ट्रिक कारवर

कंपनी सध्या इलेक्ट्रिक कारसाठी लोकलायझेशनची योजना तयार करीत आहे. यासाठी, ह्युंदाय किआबरोबर (Kia Motors) भागीदारी करू शकते. त्यानंतर ग्रीन्सच्या देशांतर्गत उत्पादनांच्या मदतीने इतर कंपन्यांशी स्पर्धा करू शकते. ह्युंदाय सध्या भारतात कोना ई या एसयूव्हीची विक्री करते, या कारची किंमत 24 लाख रुपये इतकी आहे.

किम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनीकडे भारतात ग्लोबल EV सुरू करण्याचा पर्याय आहे. याक्षणी आम्ही अशा मॉडेल्सवर काम करीत आहोत जी लुक्स आणि किंमतीच्या बाबतीत लोकांची पहिली पसंती ठरेल. आम्हाला लोकांना परवडेल असं काहीतरी द्यायचं आहे. अशा परिस्थितीत आम्ही सध्या बर्‍याच प्रकल्पांवर काम करीत आहोत, जिथे आम्हाला असं वाटतं की इलेक्ट्रिफिकेशन हा आपला महत्वाचा आधारस्तंभ होईल.

संबंधित बातम्या

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

(Skoda will not launch electric car in India, said market is not ready for such vehicles right now)