
जीएसटीचे नवे दर सोमवार २२ सप्टेंबरपासून देशभर लागू झाले आहेत. कंपनीने जीएसटी दरात कपात करुन ग्राहकांना मोठा लाभ आहेत. जर तुम्ही नवी स्कूटर खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर होंडा एक्टीवाला स्पर्धा करणाऱ्या प्रसिद्ध स्कूटर Access च्या दरात जीएसटी कपातीनंतर किती दर कमी झाले आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच होंडा कंपनीची प्रसिद्ध स्कूटर Honda Activa किती स्वस्त झाली आहे हे देखील आपण पाहणार आहोत.
होंडा एक्टिव्हाला टक्कर देणारी सुझुकी कंपनीची ही स्कूटर 8 हजार 523 रुपये स्वस्त झाली आहे. या स्कूटरची किंमत आता 77 हजार 284 रुपये (एक्स शोरूम) ते 93 हजार 877 रुपए (एक्स शोरूम) पर्यंत झाली आहे.
या स्कूटरमध्ये कलर टीएफटी डिजिटल कन्सोल, नेव्हीगेशन, लास्ट पार्किंग लोकेशनची माहिती, इनकमिंग कॉलर आयडी, व्हॉट्सअप कॉल आणि मॅसेजचे नोटीफिकेशन सर्वकाही या स्कूटरच्या डिस्प्लेवरच मिळते.
जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर होंडाची प्रसिद्ध स्कूटर एक्टीव्हा 110 सीसी आणि 125 सीसी मॉडेलची किंमत कमी झाली आहे.
110 सीसी वाले मॉडेल 7 हजार 874 रुपये तर 125 सीसी वाले मॉडेल 8 हजार 259 रुपये स्वस्त झाली आहे.
होंडा एक्टीवाच्या 110 सीसी वाले स्कूटरची किंमत 74,369 रुपये (एक्स शोरूम) आणि 84,021 रुपये (एक्स शोरूम) आहे. तर 125 सीसी वाल्या स्कूटरची किंमत 88,339 रुपये आणि 91,983 रुपयांपर्यंत झाली आहे. होंडा एक्टीव्हा स्मार्ट चावी आणि एच स्मार्ट टेक्नॉलॉजीसह टीएफटी स्क्रीन, फोन चार्जिंगसाठी 15 वॉट यूएसबी टाईप सी पोर्ट,फ्रंट आणि रिअर अलॉय व्हील, आयडल स्टॉप सिस्टीमसह मळते.
होंडा एक्टीव्हा 110 सीसी वाले 6 जी मॉडेल एका लिटरला 59.5 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देते आणि 125 सीसी वाले मॉडेल एक लिटरमध्ये 47 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.तर सुझुकी स्कूटरचा विचार करता ही स्कूटर एका लिटरमध्ये 45 किलोमीटरपर्यंतचा मायलेजची ऑफर करते.